दौंड दि २५ :- दौंड शहर व तालुका तेली समाजबांधव दरवर्षी भगवद् भक्त जय श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करतात.ह्याहीवर्षी त्यांनी पुण्यतिथी साजरी करुन संत परंपरा साजरी केली.
यावेळी दौंड शहर व तालुक्यातुन ५००-६०० समाजबांधव उपस्थित राहीले.सकाळी ५ वा.श्री विठ्ठलपांडुरंगाच्या मुर्तीचे आभिषेक श्री.गणेश चव्हान व श्री अजय क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.नंतर श्री उल्हास पवार,श्री पांडुरंग सुदाम देशमाने,श्री दत्तात्रय जाधव,श्री दिलीप किरवे,श्री विठ्ठल सुदाम देशमाने,श्री भगवान लोखंडे,श्री दिपक भिसे,,सौ.अरुणा पवार,सौ.रुपाली क्षीरसागर,सौ.मंगल पांडुरंग देशमाने,सौ.राणी क्षीरसागर,सौ.छाया शिंदे,सौ सिमा लोखंडे,सौ सुषमा क्षीरसागर,सौ कविता दळवी,श्री संतोष शिंद(हिंगणगाव),श्री नारायण क्षीरसागर(वरवंड),श्री अंबादास पवार, श्री देविदास पवार,श्री विष्णु क्षीरसागर आदि मान्यवरांच्या हस्ते श्रीविठ्ठलपांडुरंगाच्या व तेलीसमाज श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या मुर्तीला पुष्पाहार व आरती करण्यात आली आणि नंतर प्रा.श्री/कु.महेश पांडुरंग देशमाने यांच्या भगवद् भक्त संताजी जगनाडे महाराजंचे चरित्र ,तेली समाजातील उपवर वधुवर व दुरध्वनी पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
नंतर मंदिर प्रदक्षिना व वृक्षदिंडी करण्यात आली.समाजबांधवभगिनींनी काही पारंपारिक खेळांच फुगडी,नृत्याचे आयोजन केले.नंतर काही विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.त्यात सायली क्षीरसागर हिने सलग कॉमर्स शाखेतुम पदवी पर्यंत तिनदा प्रथम क्रमांक व डिस्टिंक्शन मिळवल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला.
कु.वैष्णवी व राधीका क्षीरसागर यांनी कार्यक्रम स्थळी उत्तम रांगोळीचे आरेखन केले.कार्यक्रमाचे आयोजन श्री ज्ञानेश्वर सोपानराव क्षीरसागर,श्री महेश पांडुरंग देशमाने,श्री अजय मुरलिधर क्षीरसागर,श्री गणेश विठ्ठल चव्हान,श्री.संतोष कचरे सरपंच,श्री उल्हास आत्माराम पवार, श्री सुनिल लोखंडे,श्री दत्ता लोखंडे,श्री अनिल लोखंडे,श्री अमोल भगवान लोखंडे,श्री लहु खाडे,श्री अभिजित भिसे,श्री भालचंद्र खळदे,श्री पपु लोखंडे,श्री प्रशांत मचाले,श्री तन्मय पवार ,श्री रामचंद्र वाठारकर, आदि समाजबांधव भगिनिंनी सहभाग दर्शविला.
पुणे,दौंड,पाटस,वरंवंड,खानोटा,मलठन परिसरातुन समाजबांधव श्री दिलीप चव्हान, कु.विशाल शिंदे(भिगवन) श्री.संतोष मेरुकर,श्री.गोरख देशमाने,कु.वैभव लोखंडे,श्री.महेश क्षीरसागर,श्री.वसंत लोखंडे,श्री.ज्ञानेश्वर राऊत,विनोद राउत,किरण शिंदे ,श्री सिध्देश्वर देशमाने,श्री.सुनिल उबाळे,आदि समाजबांधव उपस्थित होते.
दौंड प्रतिनिधी :- प्रा.कु.श्री महेश मंगल पांडुरंग देशमाने