पुणे दि २६ : – पुणे महापालिकेचे 2020-21 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी बुधवारी मुख्यसभेत सादर केले. पालिकेच्या उत्पनावाढीसाठी नेमण्यात आलेल्या महसूल वाढ समितीच्या भरवशावर स्थायी समितिचे अंदाजपत्रक आयुक्तांच्या अंदाजपत्रका पेक्षा तब्बल 1100 कोटीनी फुगविण्याचे धाडस समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी केले आहे. महापालिका आयुक्तांनी 6 हजार 229 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. स्थायी समितिच्या अंदाजपत्रकात 400 कोटी कर्ज तसेच आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून जाहिरात उत्पन्नाचे 250 कोटीसह, बांधकाम विभागाचे 200 कोटीचे तसेच मिळकतकराचे 300 कोटीचे वाढीव उत्पन्न गृहीत धरले आहे. या अंदाजपत्रकात शहराच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या 2 महत्वाच्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून त्यात ‘ जय गणेश सार्वजनिक गणेशोत्सव संग्रहालय आणि सारसबाग आणि पेशवे पार्क एकत्रित करून अंतरराष्ट्रीय उद्यान विकसित करणे, आंबील ओढा पुनर्विकास, मध्यवर्ती शहरात प्रवासासाठी 10 रुपयात वर्तुळाकार बस सेवा, अण्णाभाऊ साठे मराठी साहित्य संमेलन, नानाजी देशमुख रुगणालाय, शहरात तीन ठिकाणी अतिदक्षता रुग्णालय, पालिका शाळेतील 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, स्मार्ट व्हिलेजही उभारण्यात येणार आहे.