पुणे दि २७ : – पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर) बीएस एमएस अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी मागील काही दिवसांपासून बेपत्ता झाला होता व विकास कुमार हिमांशू (वय – 23) असे बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा झारखंडचा रहिवाशी आहे. हिमंशू याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार चतु:शृंगी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती व तसेच त्याच्या बेपत्ता झाल्याची माहिती संस्थेच्या @IISERPune ट्विटर हँडलवरून देण्यात आली होती व हिमंशू हा हुशार विद्यार्थी अशी त्याची ओळख आहे. गेल्या 16 फेब्रुवारीला त्याला संस्थेच्या आवारात शेवटचे पाहिले असल्याची माहिती त्याच्या मित्रपरिवाराने दिली
त्याची परीक्षा सुरु होती. सलग दोन दिवस तो परीक्षेसाठी गैरहजर राहिल्याने तो नक्की कुठे गेला, हा प्रश्न त्याच्या मित्रांना पडला होता त्यानंतर त्यांनी संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि प्राध्यापकांना हिमंशू बेपत्ता असल्याची माहिती दिली. व
मिसिंग पथक , सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडुन मिसींग मुलाचा शोध दि . २० रोजी सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे पुणे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक प्रिया टिळेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे दि १९ रोजी दाखल मन्युष्य मिसींग रजि नं २८ / २०२० अन्वये मिसींग व्यक्ती नामे विकास हिमांशु वय २३ वर्ष रा . आयसर कॅम्प पाषाण पुणे हा दि २० रोजी ११ वा ब्रेमन चौक पुणे येथील शिवनेरी बस स्टॉप वरून दादरकडे जाणा- या गाडी नं एम एच ०६ एस ९५८८ या गाडीत बसुन दादरकडे रवाना झाला असल्याचे समजले . सदर बसचे ड्रायव्हरशी संपर्क साधुन पुढील अधिक माहिती तपासात मिळाली . तसेच मिसींग व्यक्ती बाबत अधिक माहिती करीता आयसर कँम्पस पाषाण पुणे , मुलांचे वसतीगृह येथील त्याच्या रूम मध्ये शोध घेतला व परीसरातील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यानुसार केलेल्या अधिक तपासाअंतर्गत दि २५ रोजी मिसींग व्यक्ति विकास हिमांशु मुळ गावा शेजारी रेल्वे स्टेशन परीसरात असल्याची माहीती मिळुन आली . सदर व्यक्ति त्यांच्या पालकांच्या ताब्यात मुळ गावी सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले सदरची कामगिरी व तपास. अशोक मोराळे , अपर पो . आयुक्त गुन्हे , . बच्चन सिंह पो . उप . आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक . वैशाली चांदगुडे , पोलीस उप निरीक्षक प्रिया टिळेकर , सहा . पोलीस फौजदार , सुनिल कोलते , मपोना . अश्विनी केकाण यांनी केलेली आहे .