पुणे ग्रामीण दि २६ :- राजगुरूनगर ता . खेड जिल्हा पुणे येथील कृषी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकार्यास ९ हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
अनुदान मंजूर करण्यासाठी लाच घेतली. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. व राजगुरूनगर पोलीस स्टेशन , पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम – ७ आरोपी विठ्ठल ज्ञानेश्वर राऊत (वय ४९, रा. खेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राजगुरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.यातील २३ वर्षीय तक्रारदार यांनी ठिबक सिंचन-तुषार सिंचनासाठी शासनाकडून अनुदानासाठी १८ फाईल राजगुरूनगर कृषी कार्यालयात दिल्या होत्या. या फाईलच्या प्रकरणाचे अनुदान मंजूर करण्यासाठी लोकसेवक विठ्ठल राऊत याने ९ हजार रुपयांची लाचेची मागणी केली.होती व यानंतर तक्रारादर यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी राऊत यांना तडजोडीअंती ९ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. विठ्ठल राऊत हे राजगुरूनगर तालुका कृषी कार्यालयात सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून काम करत होते.
सदरची कारवाई मा . पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक श्री . राजेश बनसोडे व मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . संजय पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .