पुणे,दि २८: – प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पाल बद्रुक , ता . वेल्हे येथे घर बांधणी करीता वेल्हे तालुक्यातील पाल गावच्या ग्रामसेवकास १३ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. पंतप्रधान आवास योजनेमार्फत घरबांधणीचे अनुदान देण्यासाठी लाच घेतली. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.श्रीनिवास शंकरराव माने (वय ३४) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
माने हा वेल्हा तालुक्यातील पाल (बुद्रुक) गावचा ग्रामसेवक आहे. दरम्यान, यातील २९ वर्षीय तक्रारदाराने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी ग्रामपंचायत यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये अनुदान मंजूर केले होते.
त्यापैकी १५ हजार रुपये तक्रारदार यांना देण्यात आले होते. उर्वरित १ लाख ५ हजार रुपये देणे बाकी होते. दुसर्या टप्प्यातील ४५ हजार रुपये त्यांना द्यायचे होते. ही रक्कम देण्यासाठी ग्रामसेवक याने त्यांच्याकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी ग्रामसेवक माने याला तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून १३ हजार रुपायंची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले सदरची कारवाई मा . पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक श्री . राजेश बनसोडे व मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . संजय पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकावर सपंर्क साधण्याचे आवाहन . राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे . १ . हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २ . ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – _ _ _ दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३ . व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४ . व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई – ९९३०९९७७०० ५ . ई – मेलआयडी – पुणे dyspacbpune @ mahapolice . gov . in ६ . फेसबुकपेज – www . facebook . com – maharashtraACB ७ . वेबसाईट – www . acbmaharashtra . gov . in