चिपळूण दि २८ :- सरस्वती शिक्षण संस्था ( गुणदे, आवाशी, शेल्डी, माणी) संचलित सदगुरु काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे (माध्यमिक) व गुरुकुल विद्यामंदिर गुणदे ( प्राथमिक) प्रशालेत शुक्रवार दि. २८/०२/२०२० रॊजी “राष्ट्रीय विज्ञान दिन” साजरा करण्यात आला. महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकच्या गंभीर विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला होता. पारदर्शी पदार्थ मधून जाणाऱ्या प्रकाशांचा किरणात बदल करणारा हा बदल रामन यांनी शोधून काढला. त्यामुळे त्यांना १९३० साली भौतिकमध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीय नव्हते तर आशियातील पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ १९८६ पासून देशभरात या दिवशी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा केला जातो. १९५४ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.राष्ट्रीय विज्ञान दिवस २०२० ची थीम ही ‘Women in Science’ आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे विज्ञानाप्रती आकर्षण वाढावे, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. देशभरात विज्ञान दिन साजरा करण्याचा मूळ हेतू हाच असल्याने आज देशभरात आजच्या दिवशी विज्ञान दिन साजरा केला जातो. प्रशालेतही हा दिवस खूप उत्साहाने साजरा केला गेला. या दिनाचे औचित्य साधत प्रशालेमध्ये विज्ञान प्रदर्शन,रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना उपशिक्षिका सौ.वारणकर यांनी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ विषयी माहिती सांगितली.
परिपाठानंतर संस्थेचे सचिव श्री. सुभाषजी पवार यांच्या हस्ते गणेश पूजन, वरिष्ठ लिपिक दीपक पेढांबकर यांनी सरस्वती पूजन ,उपशिक्षक मयूर कदम यांनी सदगुरु पूजन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अश्विनी जोशी,गुरुकुलच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता विचारे यांनी दीपप्रज्वलन केले.गुणदे गावच्या प्रथम नागरिक सौ.भारती आंब्रे यांच्या हस्ते महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.गुणदे गावचे पत्रवाहक श्री.मंगेश कांगणे यांनी श्रीफळ वाढविला.त्यानंतर प्रशालेच्या सभागृहात ५ वी ते ७ वीसाठी निबंध स्पर्धा,८ वी ते ९ वीसाठी रांगोळी प्रदर्शन,३ री ते ९ वीसाठी ‘विज्ञान प्रदर्शन’आयोजित करण्यात आले होते. आरोग्य आणि सुदृढ आरोग्य, संसाधन व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि जलाशयाचे संरक्षण, वाहतूक आणि दळणवळण, डिजिटल व तांत्रिक समाधान, गणितीय प्रतिकृती हे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या विविध विषयांवर ३० प्रकल्पांचे सादरीकरण प्रदर्शनात करण्यात आले होते.त्यामध्ये निबंध स्पर्धेत सातवीतून भूमिका विजय शिर्के-प्रथम,श्रावणी आंब्रे-द्वितीय,आदिती चाळके-तृतीय,रांगोळी स्पर्धेत-प्राची नरेश गायकवाड-प्रथम(८ वी),आदिती विनोद आंब्रे-द्वितीय (९ वी),सेजल सचिन चाळके-तृतीय (८ वी),प्रकल्प प्रतिकृतीमध्ये प्राथमिक गट-तनुजा बारे – प्रथम (४ थी),तन्मय दिलखुश सोनावणे-द्वितीय (३ री),माध्यमिक गट –लहान गट- वेदा विनोद लाड –प्रथम (६ वी),आदित्य आंब्रे-(६ वी), प्रेम सत्यवान आंब्रे- उत्तेजनार्थ (७ वी),मोठा गट-अवधूत प्रमोद पोफळकर-प्रथम,श्रेया राजेंद्र साळवी-द्वितीय यांनी क्रमांक पटकावले.आजच्या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ.वारणकर,
सौ.खांडेकर,श्रीम.शामल आंब्रे,श्री.उमेश कराडकर,श्री.मयूर कदम,भिमराव भोपळे,नितीन पाटील सर्व शिक्षक-शिकेतर कर्मचारी वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.
संस्थेचे सचिव श्री. सुभाषजी पवार,गुणदे गावचे पोस्टमास्तर मोहन आंब्रे,सौ.भारती आंब्रे, यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांची पाहणी केली व विद्यार्थ्यांचे तॊंड भरुन कौतुक केले. विद्यार्थ्यांनी दिवसभर उत्साहात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला.या कार्यक्रमासाठी सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अश्विनी जोशी, गुरुकुलच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता विचारे, सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.विक्रांतजी आंब्रे,सर्व सन्मानीय संचालक परिवार यांनी शुभेच्छा दिल्या.
चिपळूण :- मयुर मंगेश कदम