पुणे ग्रामीण दि २८ :- पुणे दौंड तालुक्यातील हातवळण येथे भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसण्याची कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या वाळू उपसा करून त्या वाळूची तस्करी करत आहेत आणि त्यावरून वादविवाद होत आहेत अशा तक्रारी जयंत मीना सो अपर पोलीस अधीक्षक, बारामती यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून त्यांनी बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख श्री चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांना सांगून त्यांना सदर ठिकाणी रेड करणे बाबत सांगितले होते. त्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन हद्दीत हातवळण गावाच्या हद्दीत भीमा नदीपात्रात जाऊन माहिती घेऊन बारामती क्राईम ब्रांच चे पोलीस जवान आणि यवत पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि पोलीस जवान यांचेसह अचानक छापा टाकला असता त्या ठिकाणी आरोपी हे बेकायदेशीररीत्या बोटींच्या साहाय्याने वाळू उपसा करत असताना पोलिसांना मिळून आले. वाळू उपसा करण्याचे खालील वर्णनाचे साहित्य जप्त करण्यात आले.
1) 15,00,000 लाख रू/- 3 वाळू उपसा करण्याच्या बोटी प्रत्येकी किंमत 5 लाख रुपये 2)12,00,000 लाख/- रु च्या 3 वाळू उपसा करण्याच्या फायबर प्रत्येकी किंमत 4 लाख रुपये २७ लाख रुपया चा मुद्देमाल महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने जागीच नष्ट केला.यवत पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सदरची कामगिरी- मा. संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण मा. जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पोलीस स्टेशन चे श्री भाऊसाहेब पाटील, पीएसआय श्री जीवन लकडे,
बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक सतीश मोरे तसेच आरसीपी पथकातील ९ पोलिस जवान
आणि यवत पोलिस स्टेशनचे पोलीस जवान अमित यादव, दीपक यादव, संपत खबाले यांनी केली. महसूल विभागातील अधिकारी आणि तलाठी यांनी कारवाई कामी मदत केली.