औसा दि २८ :- तालुक्यातील तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळा या शाळेत मराठी साहित्यातील थोर साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य वि .वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.मराठी भाषेचा विकास आणि प्रचारास चालना मिळावी या दृष्टीकोनातून शिक्षक अशोक पवार यांच्या संकल्पनेतून यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम मराठी भाषेची शपथ घेण्यात आली.यावेळी शाळेतील विध्यार्थ्यांची भाषणे ,कविता गायन, अभियानासह कविता गायन निबंध लेखन स्पर्धा ,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, असे अनेक उपक्रम शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शाळेतील शिक्षक धर्मराज भिसे, विलास चव्हाण, सिद्धेश्वर आयरेकर,प्रदीप इज्जपवार, शिक्षिका अनुराधा कनामे ,सेविका स्वाती बिराजदार तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
लातुर प्रतिनिधी:-प्रशांत दिलिप नेटके