पुणे दि २९ :- पोलीस दलामध्ये प्रदिर्घ सेवा बजावून पोलीस दलामधून दि . २९ रोजी सेवानिवृत्त होणारे १ पोलीस निरीक्षक , २ पोलीस उप निरीक्षक व ७ पोलीस अमंलदार यांचे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम तसेच पो . ना . ते सपोफौ अशा विविध पदांवर पदोन्नती प्राप्त ३० पोलीस अमंलदार यांचा पदोन्नतीचा
कार्यक्रम दि २९ रोजी सकाळी ११ ते १३ या वेळेत पोलीस आयुक्त कार्यालयाचे कॉप्स एक्सलन्स हॉल मध्ये मा . डॉ . के . व्यंकटेशम् , पोलीस आयुक्त , पुणे शहर यांचे अध्यक्षतेखाली पार पडला . _ _ _ मा . डॉ . के . व्यंकटेशम् , पोलीस आयुक्त व त्यांचे कुटूंबियांनी पदोन्नतीधारक पोलीस अमंलदार यांचे
खादयांवर पदोन्नती फित लावून सत्कार केला व मा . डॉ . के . व्यंकटेशम् , पोलीस आयुक्त यांनी सेवानिवृत्त होणारे पोलीस अमंलदार व त्यांचे कुटूंबियांना शाल , श्रीफळ व बोधचिन्ह देवून सन्मानित केले . सेवानिवृत्त होणा – या पोलीस अंमलदारांपैकी पोनि शिर्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ,
माझे वडील पोलीस असल्याने कडक व शिस्तप्रिय होते . त्यांचे मुळेच मी पोलीस खात्यात भरती होऊ शकलो . संपूर्ण ३९ वर्षाच्या सेवेच्या कारकिर्दीत खडक पो . स्टे . चा कालावधी संस्मरणीय आहे . पोउनि बाळासाहेब भोर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की , ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली
तेथे एक चांगला ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला . भविष्यात पंख फाउंडेशन व इतर सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून समाजाची सेवा करणार आहे . पोहवा भुजंग बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की . जनतेच्या कोणत्याही अडचणीमध्ये कोणत्याही रुपात काम करण्याची
ताकद पोलीसांत आहे . पोलीसांच्या वर्दीविषयी आकर्षण असल्याने घरची पार्श्वभूमी रेल्वे खात्याची असूनही मी पोलीस खात्यात भरती झालो आहे . सपोफौ वाजळे यांची पत्नी सौ . कल्पना वाजंळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की , या सेवानिवृत्ती कार्यक्रमामध्ये जो कुटुंबियांनाही सन्मान
दिला गेला आहे त्याबद्दल पोलीस दलाचे आभार मानले . _ _ _ _ पदोन्नतीधारक कर्मचारी व सेवानिवृत्त होणारे कर्मचारी यांचे कुटूंबियांपैकी सपोफौ वाजंळे यांची पत्नी सौ कल्पना वाजंळे पोउनि भोर यांची कन्या अक्षता , पोहवा गोरे यांची कन्या रिया गोरे व पोहवा माटेकर यांचे पुतणे यांनीदेखील आपले मनोगत
व्यक्त केले . मा . डॉ . रविंद्र शिसवे , सह पोलीस आयुक्त यांनी सेवानिवृत्त होणा – या व पदोन्नती मिळालेल्या कर्मचा – यांना व त्यांचे नातेवाईकांना मार्गदर्शन करताना पोलीस दलामध्ये काम करताना त्यांचे कुटुंब त्यांचे पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळेच ते सक्षमपणे आपले कर्तव्य पार पाडू शकले आहेत . या सर्व
पोलीस सहका – यांच्या दक्ष कर्तव्यामुळेच आज पुणे शहर पोलीसांना राष्ट्रीय पातळीवर सहा पुरस्कार मिळाले आहेत . या कार्यक्रमाला पोलीसांचे कुटुंब आर्वजून उपस्थित राहिल्यामुळे या कार्यक्रमाला जिवंतपणा प्राप्त झाला आहे . सदर कार्यक्रमाला मा . पोलीस आयुक्त डॉ . के . व्यंकटेशम , मा . सह पोलीस आयुक्त
डॉ . रविंद्र शिसवे . अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री . अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त मुख्यालय श्री . वीरेन्द्र मिश्र , सहायक पोलीस आयुक्त श्री . मिलींद पाटील , सेवानिवृत्त पोलीस अमंलदार व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते . _ _ _ कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस उप आयुक्त मुख्यालय श्री . वीरेन्द्र मिश्र व आभार प्रदर्शन श्री . मिलींद पाटील , सहायक पोलीस आयुक्त , आस्थापना यांनी केले .