पाटोदा दि ०८ :- तुच तुझ्या आरोग्याची शिल्पकार हे ध्येय समोर ठेवून व दीनांक ८ मार्च जागतीक महीला दीनाचे औचित्य साधुन पाटोदा येथे सर्व महीलांसाठी या आरोग्य मार्गदर्शन व तपासणी शिबीराचे आयोजन झुजांर नारी मंचाच्या वतिने केले होते.
पाटोदा येथे अलिझा इंग्लिश स्कुल येथे या शिबीराचे आयोजन केले गेले. व सरस्वती पुजनाने व आयुर्वेदाची देवता धन्वंतरी च्या
पुजनाशे सुरुवात झालेल्या या शिबीरासाठी बीड येथील स्त्रीरोग तज्ञ डाँ. सौ. सोनम जायभाये(गोल्हार) यांना या शिबीरासाठी आमंत्रित केले होते. डाँ. सोनम यांनी या शिबीरात महीलांच्या मासिक पाळीविषयक समस्या, एच बी वाढविण्यासाठी चे उपाय, योग व व्यायामाचे महत्त्व, गर्भधारणा झाल्यावर घ्यावयाची काळजी, गर्भाषयाचा,स्तनांचा कँन्सर होण्याची कारणे, कीशोरवयीन मुलींची काळजी, तसेच धावपळीच्या युगात स्वतः ला कसं फीट ठेवायचं या व इतर सर्व विषयावर प्रात्यक्षिक
दाखवुन दृक श्राव्य साधनांच्या माध्यमातून मौलिक मार्गदर्शन केले. तसेच महीलांना योग्य परीसंवाद व मार्गदर्शनातुन बोलतं करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व योग्य उत्तरे देउन त्यांचे शंकासमाधान केले. महीलांनीही संकोच न करता अनेक समस्या डॉ. सोनम यांच्या समोर मांडल्या तसेच महीलांची रक्तदाबाची व हीमोग्लोबिन ची तपासणी करुन डॉ. सोनम यांनी महीलांना योग्य सल्ला सोनम यांनी दीला. समस्यावर तपा
या शिबीरासाठी पाटोद्यातील पहील्या माजी नगराध्यक्ष सौ.मनिषाताई पोटे,नगरसेविका सौ.जयश्री ताई कवठेकर, सौ. शितल जाधव, सौ. दीपाली जाधव,सौ.कीरण कांकरिया, सुरेखा खेडखर मँडम,जिल्हा समन्वय अधिकारी सुतार मँडम इ मान्यवर
महीला उपस्थित होत्या. या शिबीरात पाटोद्यातील सर्व महीलांनी व झुजांर नारी मंचाच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभाग घेतला. आलेल्या सर्व महीलांचा देखील महीला दीनानिमित्त यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच शिबीरामध्ये नविन झुंजारी मंचाच्या सदस्यांना सहभागी करुन घेण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पाटोदा तालुका उपाध्यक्ष सौ.राधा राहुल देशमुख यांनी केले. तर आभार पाटोदा तालुका अध्यक्ष सौ. संध्या श्रीराम टेकाळे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. शितल धसे, सौ.सुरेखा खडके इ झुंजार नारी मंचाच्या सदस्यांनी विशेष सहकार्य केले व हे शिबीर यशस्वी केले.