पुणे दि ०८ :- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुणे रेल्वे विभागाच्या वतीने विविध स्थानक,व आगार व कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाला महत्त्व देत पुणे स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात महिला कर्मचार्यांच्या तैनातीसह मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस पुण्याहून कोल्हापूरला रवाना झाली. पुणे रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा यांनी या रेल्वेमध्ये महिला रेल्वे कर्मचाऱ्यांचे विशेष ठिकाणी तैनात लोको पायलट, गार्ड, तिकीट तपासणी, रेल्वे सुरक्षा दल आदींचे स्वागत केले.पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा यांनी क्रू बुकिंग लॉबी आणि स्टेशन आवारात तैनात असलेल्या सर्व विभागातील महिला रेल्वे कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि
नियमितपणे राबविण्यात येणार्या महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय रेल्वे सेवांचे कौतुक केले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणाले की महिला विविध क्षेत्रात जे कामगिरी करत आहेत ते देखील समाजासाठी प्रेरणास्थान ठरणार आहेत.कोयना एक्स्प्रेसमध्ये लोको पायलट श्रद्धा तांबे, आणि संध्या कुमारी, आणि गार्ड राधा चालवाडी, यांना तैनात केले होते. महिला दिना निमित्त सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, श्रीमती सीमा अरोरा यांनी पुणे स्टेशनवरील रेल्वे उपक्रम आणि व्यवस्थेची महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारली. गार्ड, लोको पायलट क्रू लॉबी, तिकिट बुकिंग कार्यालये अशा अनेक काम ठिकाणी महिला कर्मचार्यांनीही आपली कर्तव्ये पार पाडत असलेली दिसून आले पुण्याहून सिकंदराबादला जाणारी शताब्दी एक्स्प्रेसमध्ये सर्व महिला कर्मचार्यांची गृहपालन कर्मचारी म्हणून उपस्थिती होती. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती नीलम चंद्र यांच्यासह महिला, प्रवासी, रेल्वे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते