पुणे, दि ०९ : – फरासखाना पोलीस ठाणेचे हद्दीत गणेश पेठ पांगुळ आळी येथे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाने छापा टाकून 7 लाखांचा बंदी असणारा तंबाखुजन्य पदार्थ आणि इंर्पोटेड सिंगारेटचा साठा पकडला आहे. एकाला पकडण्यात आले आहे.प्रकाश मोहनलाल जैनानी (वय 31, रा. आझादनगर, हडपसर) यांच्या दुकानात माल पकडण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात कोटपा अॅक्ट कलम 7(2), 20(2) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.राज्यात गुटखा बंदी आहे. परंतु, शहरा-शहरात छुप्या पद्धतीने गुठखा तसेच बंदी असणारे इंर्पोटेड तंबाखूजन्य पदार्थ विक्री केले जात आहेत. त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक , पुर्व विभागचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विजय टिकोळे व अशोक मोराळे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे पुणे शहर , बच्चन सिंह पोलीस उप आयुक्त , गुन्हे , पुणे शहर यांचे मार्गदर्शन व सुचना नुसार हडपसर पोलीस ठाणेचे हद्दीत शासकिय वाहनाने स्टाफसह अंमली पदार्थ गैरव्यवहारचे अनुषंगाने माहिती काढणे करीता पेट्रोलिंग करीत असताना , पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , फरासखाना पोलीस ठाणेचे हद्दीत गणेश पेठ पांगुळ आळी भागात असणारे एस . राजेश ट्रेडस या दुकानात बंदी असलेले व वैधानिक ईशारा नसलेले तंबाखुजन्य पदार्थ सिगारेटची विक्री चालु आहे , अशी बातमी मिळाल्याने लागलीच पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी स्टाफसह , एस . राजेश ट्रेडर्स , गणेश पेठ , पांगुळ आळी , पुणे या ठिकाणी जावुन बातमीची खात्री करता , सदर ठिकाणी असणारे एस . राजेश ट्रेडर्स या दुकानात इसम नामे प्रकाश मोहनलाल जैनानी , वय – ३१ वर्षे , रा . नरेन हिल्स , आझादनगर , मंहमदवाडी , हडपसर , पुणे हा हजर होता . त्याचे व पंचाचे उपस्थितीत त्यांचे दुकानाची पाहणी करता , त्याचे एस . राजेश ट्रेडर्स या दुकानात किं . रु ७ लाख ४ हजार ६२५ रुपये चा वैधानिक ईशारा नसलेले तंबाखुजन्य पदार्थ आणि विविध कंपन्यांची इंपोर्टेड सिगारेटची विक्री करताना मिळुन आलेने , ते सविस्तर पंचनाम्याने जप्त करुन नमुद इसमां विरुध्द कोटपा अॅक्ट कलम ७ ( २ ) , २० ( २ ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे . सदर कारवाई ही अशोक मोराळे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे पुणे शहर , बच्चन सिंह , पोलीस उप आयुक्त , गुन्हे , पुणे शहर यांचे मार्गदर्शना विजय टिकोळे , पोलीस निरीक्षक , अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक , पुर्व विभाग , यांनी त्यांचे हाताखालील स्टाफ सहा पो उप निरी सुशिल काकडे , पोलीस हवालदार महेंद्र पवार , पोलीस नाईक रामचंद्र यादव , चालक पोलीस शिपाई योगेश मोहिते यांनी केली आहे .