गेवराई दि १०:- ( प्रतिनिधी ) झुंजार नारी मंच बीड व महासाहेब ( उदासी ) शिक्षण प्रसारक मंडळ गेवराई याच्यां संयुक्त विद्यमाने महिला दिना निमित्त रविवार ८ मार्च रोजी शहरातील श्री.संत गजानन महाराज मंदिरात तालुक्यातील कर्तुत्ववान ११ महिलांचा भव्य सत्कार व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.या कार्यक्रमाला शहरातील अनेक महिला उपस्थित होत्या.
झुंजार नारी मंच बीड व महासाहेब ( उदासी ) शिक्षण प्रसारक मंडळ गेवराई याच्यां संयुक्त विद्यमाने महिला दिना निमित्त समाजातील प्रत्येक यशस्वी पुरषा मागे एक महिलाचा हात असते. त्यामुळे याची दखल घेत समाजातील डाॅक्टर, वकिल, पत्रकार, समाजिक, व्यापारी, शैक्षणिक सह विविध क्षेत्रात काम करणा-या पुरूषाच्या आई, पत्नी अशा समाजातील ११ महिला यात त्रिवेणी सुनील ठोसर, सुनीता मुरलीधर मोटे, शकुंतला आसाराम शिंदे,काशीबाई तुकाराम चौधरी, ज्योती सुभाष निकम, शिल्पा दिनेश पायाळ, सुनीता शिवाजी नागरे, ज्योती राजाभाऊ बनसोडे, सारसाबई भीमराव जवंजाळ, स्वाती सतिष पवार, प्रीती गणेश खडके या महिलांचा स्मुती चिन्ह व झाड देवुन मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे अनुरूपा पंडित, पोलिस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड, कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा कदम, वानखेडे,उबाळे, शोभा देशमुख, सिता महासाहेब याच्यां सह अनेक जण उपस्थित होते.या कार्यक्रमाला माॅं संतोषी अर्बन निधीपल लिमिटेड, क्रांती ड्रिप इरिगेशन गेवराई यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल गिरी व सुशिल टकले यांनी केले तर आभार डाॅ. मुरलीधर मोटे यांनी मानले.या कार्यक्रमाला विमला माध्यमीक चे मुख्याध्यापक कैलास जोगदंड, सखाराम शिंदे, सुनिल ठोसर, अप्पासाहेब मोहरकर, कालिदास काकडे, प्रविण कुल्थे,गजानन चौकटे सह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.