बारामती, दि १७ :- बारामती पोलीस स्टेशन हद्दीत २ जुगार अड्ड्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी जुगार अड्डावर छाप्यात ५ जणांना अटक केली आहे व पुणे बारामती एमआयडीसी येथे जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती व बारामती एमआयडीसी येथे कटफळ चौकात अवैध मटका जुगार चालू आहे अशी माहिती माननीय श्री जयंत मीना सो. (आय पी एस ) अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती यांना बातमीदार मार्फत मिळाली असता त्यांनी बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांना सांगून त्यांना सदर ठिकाणी रेड करणे बाबत सांगितले असता त्यांनी त्या अनुषंगाने बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत जाऊन माहिती घेऊन बारामती क्राईम ब्रांच चे पोलीस जवान आणि बारामती तालुका पोलीस स्टेशन चे जवान यांच्यासह अचानक दोन मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम हे कल्याण मटका नावाचा मटका जुगार चालवत होते. खलील नमूद मटका मालक हा agent यांच्याकडून जुगरिच्या आकड्यांवर लोकांकडून पैसे लावून हार जित चा खेळ खेळवून घेत होते. खालील नमूद आरोपीना ताब्यात घेऊन खालील नमूद वर्णनाचे साहित्य जप्त केले-1)20,900/- एकूण रोख रक्कम* 2) 00 मटका जुगार घेण्याची साधने-पेन, मटका बुके इ..आरोपी1) राजेंद्र तावरे, रा. सांगवी ता. बारामती, जि. पुणे (मटका मालक) 2) राम काकडे रा चौधर वस्ती, ता बारामती जि पुणे 3) राजेंद्र चांगळे, रा . चौधर वस्ती, ता बारामती जि पुणे
4) लक्ष्मण थोरात, रा. झेंडे वस्ती, ता बारामती जि पुणे
5) सुनील चंदनशिवे, रा. तांदुळवाडी, ता बारामती जि पुणे.एकूण ५ आरोपींविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी माननीय संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण. मा. जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप बारामती तालुका पोलीस स्टेशन
क्राईम ब्रँच बारामतीचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच-बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस जवान राजेंद्र जाधव, आबा बंडगर, आदींनी कारवाई केली