पुणे, दि.१७ :-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या क्षेत्रातील व ग्रामीण क्षेत्रातील सुध्दा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि पब ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार १५ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३ व 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना व नियमावली निर्गमित केली आहे.
तर पुणे परिसरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील हॉटेल्स आणि बार पुढील ३ दिवस बंद (२० मार्च) राहणार आहेत. हॉटेल संघटना आणि पुणे पोलिसात आज बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. शासनाने खबरदारी म्हणून मॉल, शाळा, महाविद्यालये तर बंद केली आहेतच,व एकत्र न जमण्याचे आव्हान केले आहे. तसेच राजकीय, खासगी कार्यक्रम देखील स्थगित करण्यात आले आहेत.दरम्यान, शहरातील बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी व्यापारी संघटनेने घेतला. शहर हॉटेल्स अँड बार असोसिएशनची बैठक नुकतीच पोलीस आयुक्तालयात पार पडली. यावेळी खबरदारी म्हणून उद्यापासून पुढील तीन दिवस (दि. २० मार्च) हॉटेल्स व बार बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे, अशी माहिती पुणे हॉटेल अँड बार असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले.आहे