पुुणे दि१८ :- पुणे ग्रामीण बारामती पोलीस स्टेशन हद्दीत शिक्षक सोसायटी, कसबा, बारामती शहरामध्ये गुटखाचा मोठा साठा करून बारामती शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तसेच खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात गुटखा सप्लाय करत आहेत. आणि त्याचे गोडाऊन ची माहिती घेऊन त्या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांनी रेड केली आसताना एकूण रुपये २९,लाख ९९,हजार ७००/- चा मुद्देमाल जप्त करून कारवाई केल्याची माहीती बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख श्री चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आदेश दिले होते.त्याप्रमाणे जयंत मीना सो. (आय पी एस) अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण याना गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे संतोष गायकवाड, रा वसंतनगर, बारामती आणि हरी नवले, रा शिक्षक सोसायटी, कसबा, बारामती हे बारामती शहरामध्ये साठा करून बारामती शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तसेच खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात गुटखा सप्लाय करत आहेत. सदर इसमांची आणि त्याचे गोडाऊन ची माहिती घेऊन त्या ठिकाणी रेड करणे करीता बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख चंंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले असता त्यांनी त्या अनुषंगाने बारामती शहरात कसबा आणि वसंतनगर भागात जाऊन गोपनीय रित्या माहिती घेऊन बारामती क्राईम ब्रांच चे पोलीस जवान आणि बारामती पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि पोलीस जवान यांच्यासह अचानक छापा टाकला असता सदर दोन्ही ठिकाणी हरी दगडू नवले हा खालील नमूद गुटखा बेकायदेशीर रित्या बाळगून बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आला. त्याने सदरचा माल हा संतोष लक्ष्मण गायकवाड, रा वसंतनगर, बारामती याचा असल्याचे पंचासमक्ष सांगितले. त्याचे कसबा येथील गोडाऊन मधून 18,99,700 रु चा आणि वसंतनगर येथील गोडाऊन मधून 11,00,000 रु (नक्की किंमत मोजणे सुरू आहे) चा माल असा माल त्याचे ताब्यातून खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला.29,99,700=00 रु किमतीचा विमल, महेक, गुलाम
छोटा विमल, xxx, कारगिल, RMD नावाचा गुटखा 29,99,700 एकूण मुद्देमाल सदर बाबत अन्न आणि औषध प्रशासन, पुणे यांना कळविले असून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आहे..आरोपी- 1) संतोष लक्ष्मण गायकवाड, रा वसंतनगर, बारामती, जि पुणे. 2) हरी दगडू नवले, रा शिक्षक सोसायटी, कसबा, बारामती, जि पुणे. या 2 आरोपींविरुद्ध बारामती शहर येथे गुन्हा दाखल करण्यात येत असून 1 आरोपी ताब्यात घेतला आहे. सदरची कामगिरी माननीय संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.मा. जयंत मीना सो (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग
यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील, बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे चालक भाऊसो मोरे तसेच-बारामती शहर पोलीस स्टेशन चे सपोनि श्री सचिन शिंदे, पोलिस जवान गणेश नांदे, सिद्धू पाटील, राजेश गायकवाड, रामदास जाधव यांनी कारवाई केली..