पुणे दि १८ :- जनवाडी परिसरातील काल फकीर गल्लीत काही टोळक्यांनी मोठी दहशत निर्माण केली होती. या टोळीने परिसरातील मोठ्या प्रमाणात चारचाकी आणि ऑटो रिक्षा वाहनांची तोडफोड केली होती व गुंडांच्या या दहशतीने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते वाहनांची तोडफोड करून आरोपी हे फरार झाले होते व अनोळखी आरोपींंना १२ तासाच्या आत चतुःश्रृंगी
पोलीसांनी अटक केली आहे दिनांक १७ / ०३ / २०२० रोजी २० . १५ वा . चे समारास पोलीस हवा . मुकूद ताल वसीम सिध्दीकी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दहशत माजवणाऱ्या आरोपी हा जुन्या भांडणाचे कारणावरून जनवाडी भागात राहणारे इसम नामे समीर अजिज खान शाहरूख अफजल तांबोळी व त्यांचे इतर तिन साथीदार यांनी गाड्यांच्या काचा फोडलेल्या होत्या व फरार झाले होते सध्या ते मेडी फ्रॉम चे जवळ गोखलेनगर पुणे येथे सर्वजन लपून बसले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सदर माहिता सुनिल फुलारी , अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर पंकज देशमुख , पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ – ४ पुणे शहर , लक्ष्मण बोराटे , सहा . पोलीस आयुक्त सो खडकी विभाग पुणे शहर यांना देवुन त्यांनी केलेल्या सुचना प्रमाणे अनिल शेवाळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप – निरीक्षक , मोहन जाधव . बसवराज माळी , पोहवा / मुकूद तारु , एकनाथ जोशी , पोलीस नाईक सारस साळवी , प्रकाश आव्हाड , संतोष जाधव , अशिष निमसे , प्रमोद शिंदे , पोलीस शिपाई वसीम सिध्दीकी व तेजस चोपडे , यांनी आरोपी नामे १ ) समीर अजिज खान वय २५ वर्षे रा . जनवाडी मस्जिदचे मागे , जनवाडी पुणे . २ ) मोहसीन कादर शेख वय २२ वर्षे रा . सदर ३ ) हबीब रेहमान रफिक शेख वय १९ वर्षे रा . सदर ४ ) अमीन बाबु मुल्ला वय २२ वर्षे रा . सदर ५ ) शाहरूख अफजल तांबोळी वय २१ वर्षे रा . जनता वसाहत जनवाडी पुणे यांना पकडुन गुन्हा उघडकीस आणुन आरोपीतांना दिनांक १७ / ०३ / २०२० रोजी २२ . ०० वा . अटक करण्यात आली आहे . तसेच दाखल गन्हयाचा पुढील तपास पोलीस उप – निरीक्षक , बसवराज माळी , हे करीत आहे .