पुणे दि १८ : – शिरूर नगर परिषदेमधील लिपीकाला ४२ हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या रंगेहाथ पकडण्यात आले आहे . आज दि १८ रोजी ही कारवाई करण्यात आली आहे . चंद्रकांत रंगनाथ पठारे ( वय ४७ ) असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे . याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .यातील ४८ वर्षीय तक्रारदार यांचेकडे शिरुर नगर परिषद मध्ये लेबल पुरविण्याचे काम होते . या कामाचे फेब्रुवारी २०२० चे बिल रक्कम २ लाख ७ हजार रुपये तक्रारदार यांना प्राप्त झाले होते . त्या बदल्यामध्ये मोबदला म्हणून लोकसेवक पठारे यांनी तक्रारदार यांच्याकडे ४२ हजार रुपयांची लाचेची मागणी केली . याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती . त्याची पडताळणी केली . त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले . त्यानुसार आज सायंकाळी लोकसेवक ४२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले .
सदरची कारवाई मा . पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक श्री . राजेश बनसोडे व मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . संजय पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली पूणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १०६८ क्रमांकावर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .