पुणे : – पुणे परिसरातील चतुर्श्रुंगी भागात जुनी वडारवाडीत भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली.होती आगीत 3 सिलेंडरचा स्पोट झाला असून, 25 ते 30 घरे जळाली आहेत. सुदैवाने कोणीही जखमी नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी
आग आटोक्यात आणली आहे. त्यावर कुलिंग करण्याचे काम सुरू आहे. चतुशृंगी परिसरात जुनी वडारवाडी ही झोपडपट्टी आहे.येथे. बहुतांश कामगार वर्ग या ठिकाणी राहतो. दरम्यान मध्यरात्री अचानक एका घराला आग लागली.होती नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग पसरली आणि काही वेळातच तिने शेजारच्या घरांना देखील विळख्यात घेतलेतत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती देण्यात
आली.अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र आगीने रुद्ररूप धारण केले होते. तर २५ ते ३० घरांना विळखा घातला होता. त्यामुळे आणखी बंब मागविण्यात आले. तो परीयंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. त्याच वेळी घरात असणाऱ्या एकापाठोपाठ ३ सिलेंडरचा स्पोट झाला आणि आगीची तीव्रता आणखीनच वाढली. अग्निशमन दलाने एकीकडे पाण्याचा माराकरून घरातील सिलेंडर बाहेर काढण्यात आले
अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांनी एकत्रित पाण्याचा मारा सुरू केल्यानंतर तबल एका तासानी ही आग आटोक्यात आणली. मात्र, यात २५ ते ३० घरे जळून खाक झाली आहेत. तर इतर घराना आगीची झळ पोहचली आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांची धावपळ उडाली. लहान मुले महिलांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान या आगीचे कारण समजू शकलेले नाही. सुदैवाने कोणीही जखमी झालेले नसून आग नेमकी का लागली याची माहिती घेतली जात आहे.