मुंबई दि २० :- सह्याद्री ही दूरदर्शन ची मुख्यत्वेकरुन महाराष्ट्रात प्रसारित होणारी उपग्रह व प्रादेशिक वाहिनी आहे. ही महाराष्ट्रातील दूरदर्शनची सर्वात जुनी वाहिनी आहे. याचे २४ तास प्रक्षेपण सुरु असते. मराठी बातम्या व मालिकांसाठी या वाहिनीस बराच मोठा प्रेक्षकवर्ग आहे. दूरदर्शन हे स्वतःचे कार्यक्रम स्वतःच निर्माण करते. काही कार्यक्रम, विशेषतः मालिका, ह्या खाजगी निर्मात्यांकडून पण तयार केल्या जातात सह्याद्रीस त्याचे स्वतःचे निर्माण-कक्ष आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली बाह्य-प्रक्षेपण वाहने(Outdoor Broadcasting vans), सर्व निर्मितींसाठी अद्ययावत संपादनाच्या सुविधा इत्यादीने ते परीपुर्ण आहे.एकदा असेच दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे काम कसे चालते या विषयी मनात कुतूहल होती. आमचे बाळकडू चे महानगर प्रतिनिधी पंडित आण्णा मोहिते पाटील यांच्याकडे मी ती बोलून दाखवली आणि आपण काही बोललो की पंडित आण्णा ती गोष्ट करणारच यात काही तिळमात्र शंका नाही. लगेच दोन दिवसांनी आण्णाचा फोन आला. आणि नेहमी आदराने बोलणारे पंडित आण्णा म्हणाले “कुठे आहात” उद्या आपल्याला सह्याद्री दूरदर्शन पाहण्यास जायचे आहे. मी लगेच पंडित आण्णा यांना होकार दिला.आणि आमचा टाईम फिक्स झाला वेळ होती १२.३० ते १ कारण या वेळेस सह्याद्री वाहिनीवरून बातमीपत्र सादर केले जाते. आणि हे सर्व खूप छान प्रकारे अरेंज करणारे आमचे उत्तम फोटोग्राफर महेश कदम आम्हाला घेण्यास गेट वर आले. आणि सुरक्षा रक्षक विचारत होते त्याच वेळेस महेश यांनी सांगितले की ते माझ्या बरोबर आहेत.आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला. सर्वप्रथम सह्याद्री दूरदर्शनचा लोगो असलेली इमारत उंच उंच असा सॅटेलाईट टॉवर, ओबी व्हॅन, नंतर आम्ही आत गेल्यावर, सर्वप्रथम visual audio department, video editing, voice mixing, lightning,camera बातमीपत्राचा सेट, महाचर्चा सेट, असे अनेक वेगवेगळे सेट आम्ही पाहिली
आणि नंतर आम्ही प्रतिभा आणि प्रतिमा या सेट वर गेल्यावर सर्व कॅमेरामेन, लाईटमेन कार्यक्रमाची तयार करत होते. आम्हाला लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी मिळणार म्हणून आम्ही देखील खुष होतो.काही वेळातच
लोकमत’चे सल्लागार संपादक दिनकर रायकर सर यांचे आगमन झाले सर विषयी खूप ऐकले होते. त्यांच्या अनेक बातम्या आम्ही वाचून लहानाचे मोठे झालो होतो अचानक त्यांना समोर पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला मनात खूप आनंद निर्माण झाला होता. आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री निशिगंधा वाड या आल्या होत्या. ज्याचे चित्रपट लहानपणी पाहत पाहत मी मोठा झालो होतो. त्याच माझ्यासमोर मुलाखत घेताना पाहत असताना मनात कधीच विचार केला नव्हता. की आपण या अभिनेत्रीला भेटू.
मुलाखतीला सुरवात झाली.
दिनकर रायकर यांचा जन्म कोल्हापूर तालुक्यात आरूळ या छोट्याश्या गावी झाला. प्राथमिक शिक्षण देखील गावी झाले. ८ वी ते ११वी मलकापूर येथे झाले महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथील हिसलॉप कॉलेज मध्ये झाले. मराठी आणि इंग्रजी या भाषेत जवळपास अर्ध शतकी त्यांनी पत्रकारिता मध्ये खर्च केले.
पत्रकार हे नेहमी अनुभव घेऊन सडेतोड लिहितात. निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून राजकारणाची समीक्षा करत त्याला योग्य दिशा देण्याबरोबरच राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात
काही दिवसापूर्वी त्यांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘कृ. पां. सामक जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लोकमत’चे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना काही दिवसापूर्वी देण्यात आला आहे
ज्येष्ठ मराठी पत्रकार. सध्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक आहेत. गेली सुमारे ५० वर्षे ते पत्रकारिता करत असून त्यांनी इंडियन एक्सप्रेस समूहातही काम केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार श्री. रायकर यांनी यावेळी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतील विविध आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघात काम करण्याचा अनुभव अनोखा होता. विधीमंडळातील आमदारांची भाषणे, विविध भागातील मांडले जाणारे प्रश्न यातून खूप काही शिकायला मिळाले. यशवंतराव चव्हाणांपासून विविध सरकारांचे काम पाहता आले. राजकारणातील विविध रोमाचकारी घटनांचा साक्षीदार होता आले.
तसेच आपल्या अर्ध शतकी पत्रकारितेत ते पाकिस्तानला देखील जाऊन आले. अनेक देशात त्यांनी पत्रकारितेच्या निमित्त भेटी दिल्या आहेत. सांस्कृतिक, कला, क्रिडा सामाजिक, क्षेत्रात उत्तम काम करणार व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपली छाप कायम ठेवली आहे.
आता पत्रकारिता पूर्णत: बदलली आहे. पण समाजातील प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांच्या निराकरणासाठी यापुढील काळातही पत्रकारितेचे योगदान गरजेचे आहे
ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर संजय राऊत यांच्या एकूण प्रवासाबाबत सांगतात
“पहिल्यांदा राऊत हे ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात काम करायचे. तिथं ते क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत असत. तिथं त्यांनी अनेक सनसनाटी बातम्या केल्या होत्या. त्यावेळी आपल्या लेखांमधून ते शिवसेनेच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका घेत असल्याचं बाळासाहेब ठाकरेंना वाटत होतं. 1989 ला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर संजय राऊत 1993 ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले.”
इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांना भेटायच्या असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यानंतर इंदिरा गांधी आणि लाला यांच्या भेटीचा एक फोटोही समोर आला आहे. यानंतर वातावरण चांगलंच तापताना दिसत आहे. हाजी मस्तान यांचा मानसपुत्र सुलेमान मिर्झा यानेही राऊतांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. परंतु लाला आणि इंदिरा गांधी यांची एकच भेट झाली आहे अशी माहिती मिळत आहे. तीही मुंबईत नाही तर दिल्लीत झाल्याचे समजते. ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर आणि राम पवार यांनी मुंबईत अशी कोणतीही झाली नाही असा दावा केला आहे.
दिल्लीतील इंदिरा गांधी आणि लाला यांच्या भेटीचा जो संदर्भ आहे तो लेखक, अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या पद्मभूषण पुरस्कार समारंभातील आहे. ही घटना 1973 सालची आहे.
अभिनेते आणि कवी हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांना 1973 साली पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. यासाठी ते दिल्लीला जााणार होते. हरिंद्रनाथ आणि करीम लाला यांचे मैत्रीचे संबंध असल्याने ते करीम लालाला घेऊन दिल्लीला आले. त्यावेळी करीम लालाने राष्ट्रपती भवन पाहण्याची इच्छा व्यक्त केली. या पुरस्कार सोहळ्यासाठी देशातील अनेक प्रसिद्ध लोक आले होते. यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही समावेश होता.
या समारंभात लोक आपापसात चर्चा करत होते. तेव्हा करीमा लालाने इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत फोटोही काढला. पठाणांचा नेता म्हणून त्याने ओळख करून दिली होती. करीम लालाचे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांशी चांगले संबंध होते. दिल्लीत इंदिरा
गांधी आणि करीम लाला यांच्या या एकमेव भेटीव्यतिरीक्त या दोघांची इतर कोणतीही भेट झाल्याचे पुरावे मिळत नाहीत असं दिसत आहे.
मुंबई प्रतिनिधी :- बाळू राऊत