पुणे २८: – संचारबंदी लागू केल्यानंतरही नागरिक बाहेर फिरत असल्याने पुणे पोलिसांनी रस्त्यावर वाहने अण्यास बंदी केली. तर सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल देण्यास मनाई केली आहे. मात्र एका दुचाकीस्वारास पेट्रोल न दिल्याने त्याने कामगाराला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.पुणे आरटीओ चौक येथील भारत पेट्रोल पंपाजवळ , हा प्रकार रात्री घडला आहे. याप्रकरणी प्रमोद कदम (वय ३८, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बंडगार्डन पोलिसांनी दाऊद गुड्डू नदाफ ( वय २७, रा. ताडीवाला रस्ता) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कदम हे येथील भारत पेट्रोल पंपावर काम करत आहेत. मोटार सायकल घेवुन येवुन , पंपावरील लोकांशी पेट्रोल भरण्या करीता भांडण करू लागला . त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास संचार बंदी लागु असुन , शासनाने फक्त अती आवश्यक सेवा करीता पेट्रोल डिझेल देण्याबाबत आदेश दिलेले असुन , त्यामुळे पेट्रोल देता येत नाही असे सांगितल्याचा राग मनात धरून सदर आरोपी याने बाजुला पडलेला दगड घेवुन , फिर्यादी यांचे पाठीमागे पळुन , त्यांना दगडाने डोक्यास मारहाण करून जखमी केले आहे व पुढील तपास पो. हवा. एन.एम.मोमीन करीत आहे