पुणे दि २८ :- पुणे मार्केट यार्डात रविवारी केवळ फळभाज्या आणि पालेभाज्यांची खरेदी विक्री होणार आहे. सोमवारी फळे आणि कांदा बटाटा व्यवहार सुरू राहणार आहेत. एक दिवस आड भाजी आणि फळे, कांदा- बटाटा विभागाचे बाजार सुरू राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. बहुतांशी आडते आणि कामगार कामावर येण्यास तयार झाले आहेत. जे आडते कामावर येणार नाहीत. त्यांचे गाळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ताब्यात घेण्या येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे . ते पुढे म्हणाले, रविवारी बाजारात केवळ ठोक विक्रेते आणि बाजार समितीचा परवाना असलेले कामगार आणि आडते यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.याची ग्राहकांनी नोंद घ्यावी असे त्यांनी सांगितले आहे