निरा नरसिंहपुर दिनांक २८ :- टणु तालुका इंदापूर येथील टणु गावातील ग्रामस्थांच्या वतीने कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने गोरगरीब जनतेला अन्नधान्य व किराणा बाजाराचे वाटपही करण्यात आले . गोर गरीब ६० कुटुंबेना प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे किराणा बाजार व धान्य वाटप करण्यात आले. कष्टकरी मजुरांना शेतामध्ये कामधंदा मिळेना शेतकरी काम धंदा
कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने लावण्यास टाळाटाळ केल्यामुळे कष्टकरी मजुरांना उपासमारीची वेळ आल्याने टणु गावातील ग्रामस्थांच्या वतीने गोर गरीब नागरिकांना प्रत्येकी एका कुटुंबाला दहा किलो गहू चार किलो तांदूळ एक किलो शेंगदाणा दोन किलो साखर एक किलो बेसन तूर डाळ एक किलो मटकी डाळ एक किलो मूग डाळ एक किलो बिस्कीट पुढे हळद जिरे मोहरी गोडतेल एक किलो अंगाची व कपडे यांच्या साबना या प्रकारचे खाद्यपदार्थ किराणा बाजार गरीब जनतेपर्यंत टणु ग्रामस्थ तालुका इंदापूर येथील नागरिकांनी गरीब जनतेच्या कुटुंबांना वाटप करण्यात आले. 250 ते 300 गरीब नागरिकांनी या कुटुंबातील जनतेने याचा लाभ घेतला. कुटुंबातील जनतेने माल मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून शेवटी आभारही मानण्यात आले. इंदापूर तालुक्यात प्रथमच टणु गावातील ग्रामस्थांनी हा उपक्रम हाती घेऊन गोरगरीब नागरिकांनवर आलेली उपासमारीची वेळ बाजूला सारून अन्नधान्य व बाजाराचे वाटप करण्यात आले त्याची तहान भागवणारे एकमेव गाव टणु तालुका इंदापूर हे असल्याचेही सांगण्यात आले
निरा प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार