पुणे दि २९ :- पुणे शहरात गुटख्या विक्री चोरून करणाऱ्या किराणा दुकानदारावर पुणे शहर युनिट ३ ची कारवाई केली आहे पोलीस आयुक्त , डॉ . के . व्यंकटेशम , पुणे शहर यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी अवैद्य धंदयाचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले होते व. गुन्हे शाखा युनिट – ३ , चे पथक पुणे शहर हद्दीत अवैद्य धंदयावर कारवाई व गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांनुसार पथकातील पोलीस हवालदार संतोष क्षिरसागर व पोलीस नाईक अतुल साठे यांनी गोपनीय माहिती मिळाली व दि २७ रोजी जोगेश्वरी प्रोव्हीजन स्टोअर्स १३२ / ६ शिवदर्शन पर्वती पुणे या ठिकाणी आरोपी नामे जगदिश हरगुडे वय ३२ वर्षे रा . १३२ / ६ शिवदर्शन पर्वती पुणे याचे जोगेश्वरी प्रोव्हीजन स्टोअर्स या दुकानाची झडती घेतली असता तेथे बंदी असलेला गुटखा मिळून आला व ,अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे यांचेकडील अधिका – यांसह मुद्देमाल जप्त करून ५ हजार ७८२ रूपयचेचा बंदी असलेला विमल गुटखा , पान मसाला , तसेच आर एम डी गुटखा व पान मसाला असा माल जप्त केला आहे . त्याचे विरुध्द दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता तसेच अन्न व सुरक्षा मानदे कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यास पुढील कारवाई करीता दत्तवाडी पोलीस ठाण्याकडे हस्तांतर करण्यात आले आहे . सदरची कामगिरी , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे पुणे शहर अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे पुणे शहर बच्चन सिंग , सहा . पोलीस आयुक्त , प्रतिबंधक गुन्हे , श्री . डॉ . शिवाजी पवार यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट – ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी , सहा . पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे , सहा . पोलीस उपनिरिक्षक , किशोर शिंदे , पो . हवा . संतोष क्षिरसागर , रोहिदास लवांडे , मच्छिंद्र वाळके , पो . ना . अतुल साठे , सुजित पवार , संदीप राठोड यांनी केली आहे .