पिंपरी चिंचवड दि २९ :- चिखली परिसरात घरगुती गॅस सिलेंडर मधून लहान गॅसच्या टाक्या मध्ये भरून विकणाऱ्या दुकानदाराला पोलिसांनी केले गजाआड दि २८ रोजी पोलीस उप आयुक्त , गुन्हे , सधिर हिरेमठ यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी यांना जिवनाश्यक वस्तुंचा काळाबाजार करणा – या विरूध्द कारवाई करणे बाबत सुचना पोलिस वरिष्ठांनी दिल्या होत्या व सहायक पोलीस आयुक्त आर .आर .पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वाहन चोरी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी असे चिखली पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरी करणारे गुन्हेगारांचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की , मोरेवस्ती चिखली येथील नाकोडा गॅस सहीस स्टेशन या दुकानाचे पाठीमागे खोलीमध्ये गॅस सिलेंडरचा विना परवाना साठा असुन विना परवाना लहान गॅसच्या टाक्या मध्ये मोठ्या सिलेंडर मधुन गॅस भरून सिलेंडरची जादा दराने विक्री करीत आहे . अशी माहिती मिळताच वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर , गुन्हे शाखा , युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे , तसेच वाहन चोरी विरोधी पथक व गुन्हे शाखा , युनिट १ कडील अधिकारी व कर्मचारी तसेच चिखली पोलीस ठाणे कडील वपोनि सतिश माने व त्यांचा स्टाफ यांना बोलावुन घेवुन सयुक्तीक सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी नामे अमित महादेव साठे , वय १९ वर्षे , रा . भिमशक्तीनगर , चिखली , पुणे यास मोठ्या गॅस सिलेंडर मधून गॅस लहान सिलेंडर मध्ये भरत असताना रंगेहात पकडले आहे सदर ठिकाणी भरलेले १८ मोठे गॅस सिलेंडर व १७ लहान रिकामे गॅस सिलेंडर मिळुन आले . अधिक तपास करता त्या ठिकाणी बेकायदेशीर रित्या मोठ्या गॅस सिलेंडर मधुन गॅस लहान सिलेंडर मध्ये भरून विक्री होत असल्याचे उघड झाले . त्यामुळे ताब्यात घेतलेला इसम व मिळुन आलेले गॅस सिलेंडर याना पुढील कारवाई कामी चिखली पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई , अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त सुधिर हिरेमठ , सहा . पोलीस आयुक्त आर आर पाटील यांचे दर्शनाखाली . वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर , गुन्हे शाखा , युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे , चिखली पो . स्टे . चे वपोनि सतिश माने तसेच वाहनचोरी पथका कडील पोउनि चामले , पोहवा – शेख , पोहवा – सपकाळे , पोहवा – परळे , पोना – साकोरे , पोना – उगले , पोशि – साबळे , पोशि – नांगरे यांनी केली आहे . आज दि २८ रोजी संचारबंदीचे उल्लघंन करणा – या एकुण ४६ जणांवर भा . दं . वि . कलम – १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . तसेच अवैध दारु विक्री करणा – या एकुण ०७ व्यक्तींवर प्रोव्हिबीशन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून एकुण १ लाख १२ हजार ९२६ रु . किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .