पुणे, दि. 24: महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार प्रस्तावित अपर तहसिलदार कार्यालय चाकणबाबत नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना उपविभागीय अधिकारी खेड, उपविभाग खेड (राजगुरुनगर), पाण्याच्या टाकीजवळ, वाडा रोड, राजगुरुनगर, ता. खेड यांच्या कार्यालयाकडे 8 जुलै 2026 पर्यंत सादर करावे, असे आवाहन खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी केले आहे.
प्रस्तावित अपर तहसिलदार कार्यालय चाकणच्या कार्यक्षेत्रात चाकण,आळंदी, पिंपळगाव ता. खेड, करंजविहीरे, तसेच तहसिलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राजगुरुनगर, वेताळे, कन्हेरसर पाईंट, वाडा आणि कडे बु. अशी महसूल मंडळे आहेत. प्रस्तावित अपर तहसीलदार कार्यालय आणि तहसील कार्यालय खेडमधील दोन्ही महसूल मंडळे मिळून 11 महसूल मंडळे आहेत. तसेच प्रस्तावित तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय चाकण, तालुका खेड आणि जिल्हा पुणे असणार आहे, अशी माहिती श्री. दौंडे यांनी दिली आहे.




























