पुणे,दि.२७ :- शहरातील गंभीर गुन्ह्यातील तसेच तब्बल आठ महिन्यांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट-४ ने अटक केली आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार युनिट-४, गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे फरार आरोपींचा शोध घेत असताना दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिस अंमलदार अजय गायकवाड, सुभाष आहाड व वैभव रणपिसे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, “मोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नाना ऊर्फ कार्तिक बारसुख हा फॉर्च्युन हॉस्पिटलमागे, सिद्धिविनायक कॉलनी, नवकोट वस्ती परिसरात येणार आहे.”
माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव नाना ऊर्फ कार्तिक बाळू बारसुख (वय २३, रा. इंदिरा वसाहत, वाल्मिकी चौक, गणेशखिंड रोड, औंध, पुणे) असे सांगितले.
चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन येथे संपर्क साधून अधिक माहिती घेतली असता, सदर आरोपी हा चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यातील गु.र.नं. २५३/२०२५ मधील भा.दं.वि. कलमे १०९, ११८(२), ११९(२), ३५२, ३५७(२), १४३, १४७, १४८, १४९ तसेच आर्म्स अॅक्ट व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले.
सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई मा. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनिट-४ श्रीमती कांचन जाधव यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदूम, पोलिस अंमलदार अजय गायकवाड, प्रवीण भालचिम, सुभाष आहाड, विठ्ठल वाळकुंडे व वैभव रणपिसे यांनी केली.












