पुणे,दि,२४:- वृक्षारोपण व संवर्धन क्षेत्रात केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल पुण्यातील हरित मित्र परिवार संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे यांचा शिवप्रजाराज्याम संघटनेतर्फे रक्ताचे नाते संस्थेचे अध्यक्ष राम बांगड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी लिज्जत पापड उद्योग समूहाचे सुरेश कोते, विख्यात कायदेतज्ज्ञ ऍड प्रताप परदेशी, हरित क्रांतीचे अध्यक्ष किशोर रजपूत, संघटनेचे अध्यक्ष अनंत धरत, प्लास्टिक मुक्ती अभियानाचे सदस्य ललित राठी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.घागरे यांनी कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता वृक्षारोपण, संवर्धन व चंदन लागवड या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा गौरव केला असल्याचे धरत यांनी सांगितले.
डॉ.घागरे हे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पुणे आणि सोलापूर विद्यापीठाच्या पर्यावरण समितीवर सदस्य म्हणून काम पहात आहेत. महाराष्ट्र शासनाने नुकताच त्यांचा वनश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.