पिंपरी चिंचवड दि ११ : – पिंपरी चिंचवड परिसरातून चैन चोरणा-या चोरट्या कडून ८ लाख ४८ हजार ८०० रुपयाचे मुद्देमालासह सराईत चोराला पिंपरी चिंचवड गुन्हा शाखा युनिट १ पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून चोरून नेलेली २३१ ग्रम वजनाचे सोन्याचे दागिने ८ लाख ४८ हजार ८०० रुपयाचे किमतीचा मुदेमाल हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी, समीर श्रीकांत नान्नजकर वय ४६ रा. खंडोबा मंदिरा जवळ भोसरी ,मुळ गावलातुर २३१ ग्रम वजनाचे सोन्याचे दागिने सह आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हा शाखा युनिट १ पोलिसांनी अटक केली
आहे. सहाय्यक आयुक्त राजाराम पाटिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा, युनिट १ कडील पोलीस पथक हे आरोपी गोपनीय माहिती काढुन आरोपीच्या शोधात होते. दि.०३/१२/२०१९ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांचे आदेशानुसार युनिट १ कडील सपोनि गणेश पाटील, पोउनि काळुराम लांडगे,पो.शि. गणेश सावंत, प्रविण पाटील, विजय मोरे असे भोसरी पोलीस स्टेशनचे हद्दीत रेकॉर्ड वरील, पाहीजे व फरारी आरोपी चेक करीत असताना पो.शि.गणेश सावंत यांना मिळालेल्या माहितीवरून रेकॉर्डवरील गुन्हेगार भोसरीतील रोशल गार्डन हॉटेलच्या समोर येणार असून त्याने पट्टा पट्याचे टि शर्ट व काळे रंगाची पॅन्ट घातलेली आहे व दाढी वाढलेली आहे. सदरची माहिती वपोनि उत्तम तांगडे यांचे सुचना प्रमाणे पोलीस पथकाने भोसरी येथील रोशल गार्डन परीसरामध्ये सापळा रचून थांबले असता बातमीतील वर्णनाचा इसम पायी चालत येवून रोशल गार्डन हॉटेलच्या समोरील रोडवर येवुन कोणाची तरी वाट पाहत थांबला होता तेव्हा त्यास पकडने कामी पथकातील कर्मचारी जात असताना आरोपीला पोलिसांनची चाहुल लागल्याने तो गर्दीच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला पोलिसांनी त्याचा पठलाग करून थोड्याच अंतरावर त्यास पकडले.त्यावेळी त्याचेकडे चौकशी केली असता तो पोलीस रेकॉर्ड वरील आरोपी समीर श्रीकांत नान्नजकर असल्याचे समजले. त्याचेकडे मिळालेल्या अनुशंगाने चौकशी केली असता त्याने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे व भोसरी पोलीस ठाणे कडील चैन स्नॅचिंगचे गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपी यास मा.न्यायलयात हजर करून त्याची दि.११/१२/२०१९ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडे तपास करता त्याने त्याच्या एका साथीदारासह पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये भोसरी पो.स्टे.कडील ३, एम.आय.डी.सी. भोसरी कडील ५. हिंजवडी पो.स्टे कडील २ असे एकुण १० ठिकाणी मोटार सायकली वरून येवुन महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढूूून गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने चोरलेल्या सोन्याचे दागिन्यापैकी काही दागिने त्यांने त्याचे ओळखीचे सोनारांकडे आईचे आजारपणाचे कारण सांगुन विकले व गहाण ठेवले होते ते दागिने व त्याचेकडेच मिळुन आलेले दागिने असे एकुण कि.रू.८ लाख ४८ हजार ८००/- चे २३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपी कडुन १० गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचे विरूध्द निगडी, डेक्कन, लोणी काळभोर, एम.आय.डी.सी.लातुर, हडपसर या पोलीस स्टेशनला वाहन चोरी, आर्म अॅक्ट असे एकुण ८ ,गुन्हे दाखल असुन आरोपी हा सुमारे दोन वर्ष जेलमध्ये होता. आरोपी समीर श्रीकांत नान्नजकर याने पोलीसा पासुन लपण्यासाठी आपले स्वतः चे नाव बदलुन विनायक श्रीकांत मान्नजकर या नावाचे आधार कार्ड तयार केल्याचे उघड झाले आहे.सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधिर हिरेमठ, स.पो. आयुक्त आर.आर. पाटील, श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे, सपोफौ रविंद्र राठोड, रविंद्र गावंडे, पोलीस कर्मचारी आप्पा लांडे, बाळु कोकाटे, अमित गायकवाड, मनोजकुमार कमले, अंजनराव सोडगिर,मारूती जायभाये, सचिन मोरे, प्रविण पाटील, विजय मोरे, प्रमोद गर्ने, विशाल भोईर, गणेश सावंत व तानाजी पानसरे यांचे पथकाने केली आहे. पुढील तपास सपोनि गणेश पाटील हे करीत आहेत