पुणे, दि. २० : ‘- लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत माती गणपती मंडळ येथे आयोजित कार्यक्रमात विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक अतिक सय्यद यांनी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांची माहिती दिली. यामध्ये ‘शहरी गरीब आरोग्य योजना’ महत्त्वाची असून या योजनेअंतर्गत विविध उपचारांसाठी योजनेचे कार्ड उपयोगी ठरते, अशी माहिती त्यांनी दिली.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांना विविध आरोग्य सुविधा आणि योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.
‘शहरी गरीब आरोग्य योजने’अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध उपचारांसाठी आरोग्य कार्डाचा उपयोग करता येतो. त्यामुळे पात्र नागरिकांनी योजनेची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य निरीक्षक सय्यद यांनी केले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबविण्यात येत असून, या माध्यमातून आरोग्यविषयक योजनांचीही जनजागृती करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. कार्यक्रमाला सारथी संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी अनिल पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे,
सारथीचे अभय पालवणकर उपस्थित होते



























