पुणे दि ०७ :- कोरोना प्रादुर्भावाचे अनुशंगाने केंद्र शासनाने संपुर्ण देशात लॉकडाऊन जारी केला असुन पोलीस अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आसताना चतुश्रींगी पोलीसांनी एक हात मदतीचा हा उपक्रम दि ०६ रोजी चतुश्रींगी पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी गोर गरीब रहिवाशांना
अन्नधान्याचे वाटप केले आहे व चतुश्रींगी पोलीस कर्तव्या करत आसलेल्या पोलिसांनचे रहिवाशांनी आभार व्यक्त केले आहे . सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे व सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली चतुश्रींगी पोलीस स्टेशन तर्फे संजय गांधी वसाहत स्पायसर शाळेजवळ औंध पुणे येथील झोपडपट्टीमधील रहिवाशांना अन्नधान्याचे वाटप करुन एक हात माणुसकीचा हे दाखवून दिले आहे चतुश्रींगी पोलिसांनीची नागरिकांमध्ये चर्चा होत असल्याचे पाहण्यात मिळत आहे