पुणे ग्रामीण दि २१ :- वाघोली (ता:हवेली) येथील मंडलाधिकारी आणि गाव तलाठी यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई आणि फेरफार तसेच अफरातफर झाल्याचा आरोप करत माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे यांनी वाघोलीचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे आणि गाव तलाठी बाळासाहेब लाखे यांचे दप्तर तपासणी करुन शिस्तभांगाची कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी पुणे जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी हवेली आणि हवेली तहसीलदार यांच्याकडे लेखी पञाद्वारे केली होती.मात्र हवेली महसुल विभागाकडून दप्तर तपासणी साठी सात महिन्यापासून यामध्ये वेळकाढूपणा करण्यात येत होता.अखेर हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी तात्काळ नोटीस काढून दोन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास झालेल्या विलंबाबाबत खुलासा मागिवताच याची तात्काळ दखल घेऊन निवासी नायब तहसीलदार सुरेश पाटिल ,महसुलचे नायब तहशिलदार संजय भोसले यांच्यासह सात जणांच्या पथकाने मंडलाधिकारी किशोर शिंगोटे आणि गाव तलाठी बाळासाहेब लाखे यांच्या दप्तराची तपासणी करून अहवाल सादर केला आहे.यामध्ये अनेक प्रकारच्या ञुटी आढळून आल्या असून यामध्ये डॅशबोर्ड वरील प्रमाणित नोंदी दिसून आल्या नाहीत,कार्यालयीन कामकाजाच्या वेळेचा बोर्ड लावण्यात आला नाही,माहिती अधिकाराचा बोर्ड नाही,शासकीय गायरान जमीनीवरील अतिक्रमणाची अद्यावत नोद नाही, माहीती नाही अशा सह अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आले आहेत.तर अंदाजे सहाशे ते सातशे फेरफार बाबत यामध्ये माहिती देखील देण्यात आलेले नाही,तर १३३ नोंदी अनेक महिन्यापासुन अपुरे पेपरचे कारण देत प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. त्याबाबतची कारणे चुकीची देऊन तपास आधिकार्यांची दिशाभुल करण्यात आली आहे,हस्तलिखीत सातबारा व डी.एस.सी.चा ताळमेळच बसत नसल्याचेही तपास आधिकारी यांनी नमुद केले आहे,त्यामुळे चंद्रकांत वारघडे यांनी या दप्तर तपासणी वर देखील आक्षेप घेतला असून महसूलच्या भ्रष्ट मंडलाधिकारी आणि तलाठी यांना पाठीशी घालण्याचे काम महसूल अधिकारी करत असल्याचाही आरोप चंद्रकांत वारघडे यांनी केला.