पुणे दि २१ :- पुणे शहर पोलिसांनी धडक कारवाई १८ पिस्तूला सह शस्त्रसाठा जप्त केला आहे. पुणे हडपसर परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.शस्त्र साठ्यात कुविख्यात असणार्या टोळीला हडपसर पोलिसांनी तबल १८ पिस्तूलासह सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी सराईत
गुन्हेगारांकडून १८ गावठी पिस्तुलं आणि २७ जिवंत काडतूसं हस्तगत केली. या प्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी ४ आरोपी हे शिरूर परिसरातले आहेत. या सर्वांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.अरबाज रशिद खान (वय २१, रा. शिरूर), सूरज रमेश चिंचणे उर्फ गुळ्या (वय २२, रा. फुरसुंगी), कुणाल नामदेव शेजवळ उर्फ यश (वय १९, रा. शिरूर), जयेश राजू गायकवाड उर्फ जय (वय २८, रा. शिरूर), शरद बन्सी मल्लाव (वय २१, रा. शिरूर), विकास भगत तौर उर्फ महाराज (वय २८) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अरबाज आणि विकास उर्फ महाराज हे टोळीचे प्रमुख आहेत. सर्वांवर पुणे व ग्रामीण पोलीस दलात गुन्हे दाखल आहेत. त्यात पिस्तुल तस्करी आणि इतर गुन्ह्याचा समावेश आहे, अशी माहिती परीमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. व हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे, पोलिस निरीक्षक हमराज कुंभार उपस्थित होते.शहरात व हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोडी, चोरी व अन्य गुन्हेच्या बाबत तपास करण्याचे उद्दीष्ट उपायुक्त सुहास बावचे यांनी हडपसर पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिस तपास करीत होते. त्यावेळी हडपसरमध्ये बेकायदा शस्त्रे येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या टोळीला अटक केली.त्यावेळी एक पिस्तुल सापडले. यानंतर सखोल चौकशी सुरू झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून १८ पिस्तुलं, २७ जिवंत काडतुसे, एक चोरीची मोटार सायकल असा एकूण मिळून ५ लाख ६८ हजार १०/ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.आरोपींनी या शस्त्राचा वापर विविध प्रकारचे गुन्हे करण्यासाठी व विक्रीसाठी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. अन्य काही उद्देश आहेत का ? याचीही चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान पिस्तुल कुठून आणले तसेच त्यांच्या आणखी काही साथीदार यांची माहिती मिळाली असून, आणखी शस्त्रसाठा मिळायची दाट शक्यता आहे. त्यांनी या पिस्तुलांचा काही ठिकाणी वापर देखील केला असल्याचे समजले आहे. आता त्यांनुसार तपास सुरू आहे.
गुन्हा दाखल केला व त्यामध्ये नमूद आरोपीतांना दाखल गुन्हयात दिनांक २० / ० ९ / २०२० रोजी २२/५० वाजता अटक करण्यात आले आहे . अटक आरोपीत यांचे ताब्यातुन एकुण १८ गावठी बनावटीचे पिस्तुले , २७ जिवंत काडतुसे , एक चोरीची एफ झेड मोटार सायकल मिळुन एकुण ५ लाख ६८ हजार१०० रू किंमतीचा मुददेमाल पोलिसांनी हस्तगत करुन हडपसर पोलीसांची पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील आजवरची सर्वात मोठी कामगिरी केली आहे . नमुद आरोपीतांकडून जप्त करण्यात आलेले गावठी बनावटीचे पिस्तुले व जिवंत काडतुसे यामुळे पुणे शहरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडण्यास आळा बसलेला आहे . अटक आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन यापुर्वी त्याचेवर पुणे शहर व पुणे ग्रामिण परिसरात पिस्तुल तस्करीचे , तसेच मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आरोपी अरबाज रशिद खान हा मंचर पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण यांचे गुन्हयात पाहीजे आरोपी आहे . तरी त्याचे मध्यप्रदेश राज्याचे पिस्तुल तस्करीच्या साखळी बाबत अधिक तपास चालु आहे . सदरची कामगिरी सह पोलीस आयुक्त डॉ . रविंद्र शिसवे यांचे मार्गदर्शनाखाली नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व. सुहास बावचे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर यांचे सुचनानुसार . कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे , पोलीस निरीक्षक हमराज कुंभार , सहा . पोलीस निरीक्षक संजय चव्हाण , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , सहा पोलीस फौजदार युसुफ पठाण , पो.हवा . राजेश नवले , पो.हवा.प्रताप गायकवाड , पो.ना . सैदोबा भोजराव , पो.नां . विनोद शिवले , पोना . नितीन मुंढे , पो.शि. अकबर शेख , पो.शि शशिकांत नाळे , पो.शि.शाहीद शेख , पो.शि.प्रशांत टोणपे , पो.ना गोविंद चिवळे , व पो.शि.अमित कांबळे , पो.ना.प्रविण उत्तेकर , पो . शि . नरसाळे यांनी केली आहे . सदरच्या कामगिरी बाबत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता . पुणे शहर यांनी अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे .