पुणे दि ३० :-सातारा परिसरातील शिरवळमधील एका पत्रकारावरील खुनी हल्ल्यामधील दिड वर्षापासुन फरारी आरोपीला पुणे शहर भारती विदयापीठ पोलीसांची अटक केली आहे . दि .३० नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक ,जग्गनाथ कळसकर साो यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील अधिकारी पोलीस उप – निरीक्षक , नितीन शिंदे हे त्यांच्या तपास पथकातील स्टाफसह कात्रज पोलीस चौकीच्या हददी मध्ये गुन्हयास प्रतिबंध होण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिग करित असताना पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख व सचिन पवार यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , शिरवळ मधील पत्रकार मुराद पटेल यांच्यावरील खुनी हल्ल्यातील पाहीजे आरोपी शफीक रफीक शेख हा कात्रज बायपास चौकाच्याजवळ मित्रांना भेटायला येणार आहे मिळालेली बातमी . वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो यांना कळविली असता त्यांनी योग्य ति कारवाई करण्याबाबतचे आदेश दिल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन त्याच्यावर भारती विदयापीठ पोलीस ठाणे पुणे त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने त्याच्या इतर साथीदार याच्यासह पत्रकार मुराद पटेल यांच्यावर कट रचुन दि .११ / ०४ / २०१ ९ रोजी रात्रौ १०.३० वा सुमा . मौजे शिरवळ , ता खंडाळा , जि सातारा गावच्या हददीत शिवाजी चौक ते सटवाई कॉलनी जाणाया रोडवर मदरश्या लगत गाडी अडवुन सत्तुर आणि चाकु यांच्या सहयाने खुनी हल्ला केला होता अशी कबुली दिली आहे . त्याबाबत शिरवळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे . गुन्हा दाखल झालेपासुन नमुद आरोपी हा दिड वर्षापासुन स्थानिक पोलीसांना गुंगारा देत होता.सदर दाखल गुन्हयामध्ये यापुर्वी त्याचे साथीदारांना स्थानिक पोलीसांकडुन अटक करण्यात आली आहे . सदरची कारवाई सागर पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ०२ , पुणे शहर , सर्जेराव बाबर , सहाय्यक पोलीस आयुक्त , स्वारगटे विभाग , पुणे शहर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर , अर्जुन बोत्रे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , भारती विदयापीठ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकांचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक , नितीन शिंदे , तपास पथकांचे अंमलदार संतोष भापकर , रविन्द्र भोसले , सोमनाथ सुतार , सर्फराज देशमुख , सचिन पवार , अभिजीत जाधव , गणेश शेंडे , राहूल तांबे , व विक्रम सावंत यांनी कारवाई केलेली आहे .