पिंपरी चिंचवड दि ११ :-औंध हॉस्पिटलचे आवारात पूर्ववैमनस्यातून दोघांनी मिळून एका तरुणाचा खून केला.होता व ही घटना गुरुवारी (दि. 10) रात्री दहा वाजता औंध रुग्णालयाच्या आवारात घडली. घटनेनंतर अवघ्या आठ तासात पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट ५ दोन्ही आरोपींना घेतले ताब्यात
सर्व्हंट क्वार्टर, सांगवी फाटा, औंध), विक्रम उर्फ बिकू श्रीकेसरीन सिंग (वय १८, रा. बोपोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शेखर मनोहर चंडाले (वय २७, रा. नवी सांगवी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गोविंद केडाशिवा वाघेला (वय ५०, रा. सर्व्हन्ट क्वार्टर, औंध हॉस्पिटल, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण शेखर आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास शेखर औंध हॉस्पिटल आवारात पार्किंगजवळ असलेल्या एका झाडाजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपींनी शेखरच्या डोक्यात लोखंडी गजाने मारून त्याचा खून केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला.होता व गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरचा प्रकार हा औंध हॉस्पिटलचे आवारात झालेला असल्याने व त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाल्य होते व पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , कृष्ण प्रकाश यांनी गंभीर दखल घेतल्याने. पोलीस उप – आयुक्त , गुन्हे , सुधीर हिरेमठ , यांनी गुन्हे शाखेस समांतर तपास करुन आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते . त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक , प्रसाद गोकुळे , गुन्हे शाखा युनिट -४ , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख यांनी त्यांचे पथकासह सदरच्या गंभीर गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला व आरोपींचा शोध सुरु केला होता . दोन्ही आरोपी हे गुन्हा केल्या नंतर मोबाईल फोन बंद करुन पळुन गेल्याने त्यांचा शोध घेणे कठिण जात होते. व पोलिसांनी आरोपींच्या मित्रांची माहिती काढुन सदर मित्रांचे मदतीने आरोपी गुन्हा केले नंतर लपुन बसण्याची शक्यता असलेली सर्व ठिकाणे रात्रीतुन शोधुन काढली . त्यावेळी आरोपी हे आंबडेकर चौक , भाऊ पाटील रोड , बोपोडी येथे नाल्याचे कडेला लपुन बसले असल्याची माहिती मिळाल्याने व ठिकाणी सापळा रचुन आरोपी नामे १ ) अक्षय अशोक नाईक , वय -२३ वर्षे , रा- जिल्हा सरकारी हॉस्पिटल मागे , सबैट कॉर्टर , सांगवी फाटा , औंध , पुणे २ ) विक्रम ऊर्फ बिकु श्रीकेसरीन सिंग , वय -१८ वर्षे रा – गल्ली नंबर -२४ , रेल्वे क्रॉसिंग गेट समोर , बोपोडी , पुणे यांना शिताफीने ताब्यात घेतले . आरोपींना ताब्यात घेतलेवर मुख्य आरोपी नामे अक्षय नाईक याचे कडे केलेल्या चौकशीत त्याने त्याचा साथिदार नामे विक्रमसिंग याचे सह मिळुन पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन गंभीर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे .व गुन्हे शाखा युनिट -४ चे अधिकारी व कर्मचारी यांनी धडाडीने व कसुन तपास करुन गुन्हा दाखल झाल्या पासुन ०८ तासाच्या आत मुख्य आरोपीस त्याचे साथिदारासह अटक करुन गुन्हा उघडकिस आणला आहे . यातील मयत हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचे विरुद्ध यापुर्वी सांगवी पोलीस ठाणे येथे मारामारीचा ०१ गुन्हा दाखल आहे . आरोपींना पुढील कारवाई कामी सांगवी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले असुन पुढील तपास सांगवी पोलीस ठाणे करीत आहे . सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे सुधीर हिरेमठ , सहा . पोलीस आयुक्त . राजाराम पाटील गुन्हे यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा , युनिट -४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे , सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , सहा.पो.उप.नि. धर्मराज आवटे , पोहवा प्रविण दळे , नारायण जाधव , संजय गवारे , दादाभाऊ पवार , अदिनाथ मिसाळ पोना संतोष असवले , तुषार शेटे , लक्ष्मण आढारी , मो . गौस नदाफ , वासुदेव मुंडे पोशि शावरसिध्द पांढरे , प्रशांत सैद , सुनिल गुट्टे , तुषार काळे , सुरेश जायभाये , अजिनाथ ओंबासे , धनाजी शिंदे , सुखदेव गावंडे , गोंविद चव्हाण , अतुल लोखंडे व नागेश माळी , राजेंद्र शेटे तांत्रिक विश्लेषन विभाग गुन्हे शाखा यांनी केली आहे .