पुणे दि ११ : – पुणे परीसरात कोथरुड जेष्ठ दांपत्याचे खिडकीचे गज कापून बंगल्यात घुसून शस्त्राचा धाक दाखवून घरातील ११ लाख ५२ हजाररुपयांचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तर त्यांच्या हातावर वार करून त्यांना जखमी केले आहे. या घटनेनंतर कोथरुड परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात 74 वर्षीय जेष्ठ नागरिकांने फिर्याद दिली आहे त्यानुसार केअर टेकर संदीप व त्याच्या दोन
साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार काल मध्यरात्री घडला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नी हे दोघेच जय भवानी नगर येथे त्यांच्या बंगल्यात राहतात.त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो, तर विवाहित मुलगी बावधन येथे राहते. दरम्यान त्याच्या देखभालीसाठी ते केअर टेकर ठेवतात. त्यांनी संदीप याला केअर टेकर म्हणून कामास ठेवले होते. काही वर्षे त्याने काम केले. मात्र दीड वर्षांपूर्वी त्याने येथील काम सोडले. त्यामुळे त्याला फिर्यादी यांची व त्यांच्या घराची पूर्ण माहिती होती. दरम्यान काल
मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आरोपी संदीप व त्याचे दोन साथीदार हे गच्चीवर असलेल्या खिडकीचे गज कापून आत शिरले. त्यांच्याजवळ घातक शस्त्र होती.आत आल्यानंतर त्यांनी फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्याला कोयता व धारधार शस्त्र लावत ‘आवज करने का, नहीं’ असे म्हणत त्यांना धमकावले. तसेच त्यांच्या हातावर वार करत त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांच्या बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून रोकड आणि दागिने असा 11 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. यानंतर फिर्यादी हे खूपच घाबरून गेले होते. त्यांनी नातेवाईक आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत, पाहणी केली.व कोथरूड पो ठाणे अंतर्गत एरंडवणा चौकीचे कार्यक्षेत्रात करून बंगल्यातून ३८ तोळे सोन्याचे दागिने . ३ हजार अमेरिकन डॉलर व रू ८० हजार रोख रक्कम , अशी एकूण ११ लाख ५२ हजाररुपयांचे चोरी केल्याची खबर कोथरूड पोलीस ठाणे येथे दि . १०/१२/२०२० रोजी पहाटे मिळाली . त्या अनुषंगाने कोथरूड पोलीस ठाणे गुन्हा दाखल झाला होता व गुन्हयाचे तपासासाठी कोथरूड पोलीस ठाणेकडील तपास पथकातील २ टीम तातडीने कार्यरत करण्यात आल्या फिर्यादीने दिलेल्या माहीतीवरून , गुन्हयाचे अनुषंगाने गोपनीय यातमीदाराकडून प्राप्त झालेल्या माहीतीच्या आधारे कोथरूड पोलीस ठाणेकडील तपास पथकाने दि . ११/१२/२०२० रोजी पहाटे आकाश कांबळे वय २२ वर्षे रा . निगडी पुणे यास संशयित म्हणून चिंचवड परिसरातून ताब्यात घेतले . त्याच्या मदतीने गुन्हयातील इतर तीन संशयित इसम दिपक सुगावे वय २१ वर्षे रा . चिंचवड पुणे , संदीप हांडे वय २५ वर्षे रा . वाल्हेकरवाडी पुणे व छगन जाधव वय ४८ वर्षे रा . वाल्हेकरवाडी चिंचवडगाव पुणे यांना गुन्हयात चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले . नमूद ताब्यात घेतलेल्या संशयित इसमांकडे गुन्हयाची पार्श्वभुमी तपासली असता असे निष्पन्न झाले, या गुन्हयाचा मास्टर माइंड छगन जाधव याची अजिंक्य नसिंग नावाची कामगार पुरविण्याची एजन्सी चिंचवड भागात असून नमूद एजन्सीमार्फत संदीप हांडे हा गुन्हयातील फिर्यादीचे बंगल्यामध्ये सुमारे वर्षभरापुर्वी केअर टेकर म्हणून दीड महिना कामास होता . त्या दरम्यान संदीप हाडे याने फिर्यादीच्या बंगल्याची रेकी केली होती . तसेच बंगल्याचे आतमध्ये फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या मौल्यवान वस्तू , पैसे ठेवण्याची जागेची पाहणी केली होती . संदीप हांडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने त्याचे इतर दोन साथीदारांमार्फत मास्टर माईंड छगन जाधवच्या मार्गदर्शनाने बंगल्याच्या गच्च्छीवरील खिडकीचे गज कापून बंगल्यात प्रवेश केला होता . फिर्यादी व त्यांच्या पत्नीस कोयता व इतर धारदार शस्त्राचा धाक दाखवून , त्यांना जिवे मारण्याची धमकी देवून त्यांच्याकडून कपाटाच्या चाव्या बळजबरीने घेवून कपाटातील मौल्यवान सोन्याचे दागिने व इतर रोख रक्कम अशी एकूण रू ११ लाख ५२ हजाररुपयांचे ऐवज व रोख रक्कमेची चोरी केली होती . छगन जाधव हा पुणे शहरातील जेष्ठ नागरिकांचे बंगले हेरून त्याठिकाणी आपल्या एजन्सीमार्फत संदीप हांडे व इतर आरोपींना केअर टेकर व इतर कामाकरीता नेमून तेथील राहत्या घरांची रेकी करून तेथील परिसराची माहीती घेवून त्याठिकाणी जबरी चोरी करतात असे निष्पन्न झाले आहे . अशा प्रकारे जबरी चोरी करण्याचे अनेक गुन्हें छगन जाधवच्या मदतीने संदीप हांडे व इतर आरोपींनी केलेले आहेत . दाखल गुन्हयात सध्या ४ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून नमूद गुन्हयातील मुद्देमाल जप्त केला आहे . नमूद आरोपींनी तपासा दरम्यान अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड , पुणे शहर भागात गुन्हे केल्याची माहीती तपासा दरम्यान प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने तपास कार्यवाही चालू आहे . सदरचा गुन्हा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ पुणे , सहा पोलीस आयुक्त कोथरूड विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि सुनिल ताये , पोनि गुन्हे . बाळासाहेब बडे सपोनि असाराम शेटे , पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील , सहा फौज . दत्ता शिंदे . पोहवा विलास ढोले . पोहया विलास जोरी , पोना नलीन येरुणकर , पोना सचिन कुदळे , पोना विजय कांबळे , मनोज पवार , नितीन कानवडे , युवराज काळे , राहुल ढोबळे , प्रितम निकाळजे , अजय सावंल . भास्कर बुचडे , विजय काकडे यांनी नमूद गुन्हयातील सर्व आरोपींना गुन्हा घडलेपासून २४ तासाचे आतमध्ये पकडून गुन्हयातील मुद्देमाल जप्त केला आहे . ( सुनिल तांबे ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरुड पो स्टे पुणे शहर यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे