पुणे, दि. १२ : -‘मतवाली मनचली कविताएँ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.उत्तराखंड येथील देवयानी मुंगली यांच्या लेखनीतून साकारालेला ‘मतवाली मनचली’ कवितासंग्रहातील कविता लहान मुलांना शौर्याचे धडे देतात. कवितासंग्रह वाचनातून पुन्हा एकदा पुस्तकांच्या विश्वात रममाण व्हावे वाटत आहे. देवयानी मुंगली यांच्या कविता मनाला भावणाऱ्या आहेत. लहान मुलांसाठी हा कवितासंग्रह वाचनीय असल्याचे सांगतानाच येणाऱ्या कालावधीत आणखी चांगल्या रचना देवयानी यांच्या लेखनीतून पुढे येतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक प्रणित मुंगली यांनी तर आभार श्रीमती देवयानी मुंगली यांनी मानले. यावेळी संस्कृती परिवारातील सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.