पुणे विभागातील 5 लाख 62 हजार 708 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 5 लाख 85 हजार 399 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.०२ :- पुणे विभागातील 5 लाख 62 हजार 708 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 85 हजार 399 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 636 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 55 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.74 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.12 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
*पुणे जिल्हा*
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 79 हजार 610 रुग्णांपैकी 3 लाख 65 हजार 581 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 57 आहे. यामध्ये 4 स्ट्रेन या नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 972 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.30 टक्के आहे.
*सातारा जिल्हा*
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 56 हजार 355 रुग्णांपैकी 53 हजार 880 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 659 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सोलापूर जिल्हा*
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 385 रुग्णांपैकी 48 हजार 876 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 713 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 796 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सांगली जिल्हा*
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 105 रुग्णांपैकी 46 हजार 242 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 114 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 749 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कोल्हापूर जिल्हा*
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 944 रुग्णांपैकी 48 हजार 129 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 93 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ*
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 379 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 253, सातारा जिल्ह्यात 66, सोलापूर जिल्ह्यात 39, सांगली जिल्ह्यात 8 तर कोल्हापूर जिल्ह्यात 13 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण*
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 527 आहे. पुणे जिल्हयामध्ये 423, सातारा जिल्हयामध्ये 20, सोलापूर जिल्हयामध्ये 57, सांगली जिल्हयामध्ये 24 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 3 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 37 लाख 18 हजार 615 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 85 हजार 399 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 1 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )