पुणे दि ३०: – सोलापूर पोलीसांच्या ताब्यातुन पळुन गेलेला आरोपीला चतुर्श्रुंगी पोलीसांनी अटक केली आहे व दर्पण ब्युटी पार्लर गोकुळ कृष्ण विकास महामंडळाच्या जवळ जनवाडी पुणे येथे चोरी करून पळून गेलेला आरोपी पुणे येवत येथे शिताफिने पकडण्यात आले आहे आरोपी हे सोलापूर पोलीस स्टेशन येथून चोरीच्या व ईतर गुन्ह्यातून २ दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेले होते व सदर गुन्हयामधील पळुन गेलेला आरोपी नामे 1) दिलीप बॅबलिंग भोसले, वय 40, रा. एम लाडुळे, पोस्ट हलदूर, ता बाशी, झेड. सोलापूर 2) करण दिलीप भोसले, वय 20, रा गायत्री नगर, हनुमान मंदिरा जवान, भिवंडी, ठाणे 3) बाळू शहाजी शिंदे, वय 25, रा. एम लाडूले, पोस्ट हळदूर, ता बाशी, झेड. सोलापूर
दर्पण ब्युटी पार्लर गोकुळ कृष्ण विकास महामंडळाच्या जवळ जनवाडी पुणे येथे दि ५ डिसेंबर २०२० रोजी चोरी करून पळून गेले होते व चतुर्श्रुंगी पोलीस तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी हे येवत येथे असलेबाबत खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाल्याने सदर गुन्हयाचा तपास करीत असताना चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. अनिल शेवाळे यांच्या सूचनेवरून, पुणे यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी गोपनीय बातमीदारामार्फत प्राप्त माहीतीद्वारे पुणे येवत येथे जावुन आरोपीस शिताफिने पकडण्यात आले.व ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल ३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे
आहे .पुढील तपास पोलिस पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले करीत आहेत.सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गलांडे, वपोनि अनिल शेवाळे यांच्या सूचनेवरून पोनि दादासाहेब गायकवाड गुन्हे , पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले ,मोहनदास जाधव,पो.हवा. दिनेश गड अंकुश, मुकुंद तारू,पो.ना. श्रीकांत वाघोले ,प्रमोद शिंदे, संतोष जाधव, प्रकाश आव्हाड, सारस साळवी, आशिष निमसे, ज्ञानेश्वर मुळे, पो कॉ.अमोल जगताप , वसीम सिद्दिकी, तेजस चोपडे, माने , सिदगी शिंदे जाधव , मोमीन यांच्या पथकाने केली आहे