पिंपरी चिंचवड दि १६ :- पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने 32 वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने वाहतूक जनजागृती दिंडीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण पद्धतीने वाहतूक नियमांची जनजागृती .आज दिनांक 16 रोजी 32 वा रस्ता सुरक्षा अभियान 2021 निमित्त रस्ते अपघात प्रतिबंध व वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी कृष्ण प्रकाश , पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेच्या वतीने जनजागृतीपर वाहतूक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते . सदर वाहतूक जनजागृती दिंडीची सुरुवात सकाळी 11 वाजता फुटवाले धर्मशाळा आळंदी येथून झाली . या मध्ये
महाविद्यालयीन विद्यार्थी , विद्यार्थिनी , प्राध्यापक एनएसएस व इतर सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या . दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातात वाहतूक नियमांचे पोस्टर्स व बॅनर्स होते . तसेच जनजागृती रथ , पालखी , बैलगाडी , लेझीम पथक , भजनी मंडळ इत्यादी माध्यमातून वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात आली . सदरच्या दिंडीचा शेवट फुटवाले धर्मशाळा सभागृह याठिकाणी झाला . तेथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या वाहतूक विषयक निबंध लेखन , चित्रकला , पोस्टर स्पर्धांमधील प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना कृष्ण प्रकाश , पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत संत साहित्यातील विविध उदाहरणे , दाखले देऊन जनजागृतीपर मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना. श्रीकांत डिसले , सहाय्यक पोलीस आयुक्त , वाहतूक शाखा , पिंपरी चिंचवड यांनी वाहतूक शाखेकडून 32 वा रस्ता सुरक्षा अभियान 2021 दरम्यान राबविलेल्या कार्यक्रमांची माहिती देऊन , वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले . सदरच्या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त . मंचक इप्पर व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आदे , पोलीस निरीक्षक चौधर , पोलीस निरीक्षक साबळे , पोलीस उपनिरीक्षक रिकिबे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते . या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर , सचिव अजित वडगांवकर , विश्वस्त प्रकाश काळे , शरदचंद्र पवार कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर थोरात , ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दिपक मुंगसे , ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे व महाविद्यालयीन विद्यार्थी , प्राध्यापक , प्रतिष्ठित नागरिक इ . उपस्थित होते . पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली .