पुणे दि १६ : -लोखंडी पुल गोंधळेनगर , हडपसर पुणे येथून एकास गावठी पिस्टलसह हडपसर पोलिसांच्या पथकाने (ता.१५) तडीपार आरोपीसह ताब्यात घेतले.१ लाख ३४ हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच बेकायदेशिररित्या गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. पोलीस वरिष्ठांच्या आदेशान्वये हडपसर पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधात्मक पेट्रोलींग पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदिप सोनवणे पो.ना. नितीन मुंढे , पो . ना . समिर पांडुळे , पो.शि. निखील पवार , पो.शि. प्रशांत दुधाळ , पो.शि. शशिकांत नाळे यांचेसह करीत असताना , पोलीस नाईक मुंडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , एक इसम लोखंडी पुलाजवळ गोंधळेनगर , हडपसर पुणे येथे सार्वजनिक रोडवर त्याचे बुलेट मोटार सायकल यावर बसलेला असुन त्याचेकडे पिस्टल आहे . अशी त्याचे वर्णनासह खात्रीशीर बातमी मिळाली . सदर बातमीचा आशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, हडपसर पोलीस स्टेशन पुणे यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन बातमी खात्री करुन योग्य ती कारवाई करणेबाबत सुचना व आदेश दिल्याने सदर भागात सापळा लावुन रात्रौ २०.४० वा.चे सुमारास अजय दिलीप लाळगे ऊर्फ डी वय २६ वर्षे रा . सर्व्हे नं . १३ , भगतसिंग कॉलनी , गोंधळेनगर हडपसर पुणे यास पकडून त्याची अंगझडती घेता , त्याचे कब्जातुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे असा माल मिळून आले तेंव्हा त्याचेविरूध्द हडपसर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.तसेच सदरची कारवाई करीत असतांना एक तडीपार आरोपी नामे विनित रविंद्र इंगळे वय २१ वर्षे रा.राहुल कॉलनी एकविश्व कॉप्लेक्स जवळ सातववाडी हडपसर पुणे.यास २ वर्षे करीत पुणे आयुक्तालयातुन तडीपार करण्यात आलेला असातांना तडीपारी आदेशाचा भंग करुन मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आली आहे . सदरची कामगिरी.नामदेव चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व. नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली. कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , पोनि . ( गुन्हे ) . राजु अडागळे , पोनि . ( गुन्हे ) दिगबंर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक संजय चव्हाण , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , प्रताप गायकवाड , पोलीस नाईक सैदोबा भोजराव , समिर पांडुळे , संदिप राठोड , अविनाश गोसावी , नितीन मुंढे , पोलीस शिपाई शशिकांत नाळे , शाहीद शेख , प्रशांत टोणपे , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , निखील पवार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास हडपसर पोलीस चौकीचे पोलीस उप निरीक्षक एस बी जाधव हे करित आहेत .