अहमदपूर दि २१ :- अहमदपूर तालुक्यांतील २३ वर्षीय मुलीला घरात एकटीच असताना जबर माहाराण करून विनयभंग केला. या प्रकरणातील सर्व आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. मुलीला अमानुषपणे मारहाण करून तिचा मोबाईल हिसकावून घेण्यात आले. या घटनेबद्दल मुलीचा कुटुंबीयांशी व मुलीची प्रकृती माहिती घेण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिलजी देशमुख यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांनी माहिती दिली आहे. आरोपींशी संबंधित व्यक्तींची पोलिस ठाण्यात मुलीची तक्रार नोंदविली जाऊ नये, तसेच तिला शासकीय रूग्णालयात दाखल करू नये म्हणून सर्व स्तरांवर प्रयत्न केले गेले.शेवटी मुलीला बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या शासकीय रूग्णालयात दाखल करावे लागले.लातुर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुनिता आरळीकर यांनी या प्रकरणाची माहिती ना.नीलमताई गोर्हे यांना लक्ष घालण्याची विनंती करुन त्वरेने मदतीची अपेक्षा व्यकत केली.तक्रारदाराचे कुटुंबीयांनी किनगाव पोलिस ठाणे,अहमदपूर पोलिस ठाणे येथे विनवणी करूनही मुलीची तक्रार नोंदवून घेतली नाही. मुलीला अंबाजोगाईच्या रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.ज्या वेळी मुलीचा भावाने नांदेड येथे पोलिस महारानिरीक्षक कार्यालयात संपर्क केला तेव्हा गुन्हा नोंदविला. सदरील आरोपीस अद्यापही अटक झालेली नाही तरी खालील प्रमाणे आवश्यक कारवाई करण्यास संबंधित तपास अधिकारी यांना सूचना द्याव्यात ही विनंती.
आरोपीस तात्काळ अटक करावी,या घटनेचा तपास कमीत कमी वेळेत पूर्ण करावा व या केसचे चार्जशीट लवकर न्यायालयात दाखल करावे, आरोपींना जामीन मिळणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना द्यावी, मुलीला संरक्षण द्यावे तसेच मनोधैर्य योजनेतून मदत मिळावी, आरोपींना कठोरात-कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. ऊपसभापती कार्यालयातील अधिकारी त्वरित लातुर पोलीस अधिक्षक यांच्याशी व वरील बाबी बाबत तपास करणारे पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले आहेत. त्याचप्रमाणे या प्रकरणी ना.डॅा.नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री.अनिल देशमुख यांना पत्र देऊन याबाबतीत आरोपींवर कडक कारवाई व्हावी असे निर्देश दिले आहेत .