पुणे ग्रामीण दि१६ :- मलठण येथील गावठी हातभट्टीवर पोलिसांनी माेठी कारवाई करण्यात आली. आहे १ लाख १० हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
दाैंड पाेलीस स्टेशनचे पाेलीस उपअधीक्षक यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मलठण येथील इसम नामे निलेश लाेंढे रा. मलठण तालुका दाैंड व त्याचा साथीदार नाव पत्ता माहित नाही.बेकायदेशीर विना परवाना गावठी हातभट्टी दारु तयार करत आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळताच उ.अधीक्षक व त्यांच्या पथकाने छापा टाकला.या वेळी १ लाख १० हजार रुपये किंमतीचे गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याची साधने मिळून आली. हातभट्टी दारुचे रसायन अंदाजे ४ हजार लिटर,२० प्लॅस्टिकचे ड्रम,१ लाेखंडी ड्रम व दारु काढण्याची साधने नष्ट करण्यात आले.
सदर इसमांविराेधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्या प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास बिट अंमलदार संताेष शिंदे करीत आहेत.पुणे ग्रामीणचे पाेलीस अधिक्षक अभिनव देशमुख,अप्पर पाेलीस अधिक्षक मिलींद माेहिते,उपविभागीय पोलीस अधिक्षक अमृत देशमुख यांच्या देखरेखीत परिवेक्षाधीन उपअधिक्षक मयुर भुजबळ,पाेलीस अंमलदार विशाल जावळे,किरण ढुके,करमचंद बंडगर,याेगेश कर्चे,डी.व्ही.ढाेले यांनी कारवाई केली. मात्र
दाैंड आणि यवत पाेलीस स्टेशन हद्दीतील गावठी हातभट्टीच्या महापूराला जबाबदार पाेलीस अधिकारी व बिट अंमलदारांवर वरिष्ठांकडून कारवाई हाेणार का ? का असेच तालुक्यात अश्या बेकायदेशीर चालणाऱ्या उद्योगांकडे दुर्लक्ष होणार अशी चर्चा व्यसनमुक्त युवक संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे.
याचा स्थानिक नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.तसेच संचारबंदी च्या आताच्या काळातही दौंडमधून मुख्य रस्त्याकडेचे सिद्ध टेक ,कुरकुंभ पाटस इत्यादी हॉटेल्स ,धाबे चालू असतात त्यावरही नियंत्रण कोण ठेवणार आहे की नाही असा प्रश्न पडतो.
दाैंड प्रतिनिधी :- प्रा.महेश पांडुरंग देशमाने