गुहागर दि ०७ :- महाबोधी सोसायटी बेंगलोर, महाबोधी मैत्री मंडळ त्याचप्रमाणे बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर जि. रत्नागिरी या तिन्ही संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय पूज्य भन्ते जी विमल बोधी (पवार-साक्री) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गोरगरीब जनतेला पावसाळी साथीच्या रोगांपासून बचावाकरता वैद्यकीय साहित्य, कोव्हिडं स्वयंसुरक्षा साहित्य तसेच राशनकिटचे वाटप बौद्धजन सहकारी संघाचे अध्यक्ष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहा शृंगारतळी, जानावळे येथे करण्यात आलं.तालुक्यातील सर्वच स्तरातील गरजूंनी सदर उपक्रमाचा लाभ घेत सर्व कार्यकारणी मंडळाचे आभार व्यक्त केले