श्रीगोंदा,दि.०१:- दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठया प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.हीच गरज ओळखून श्रीगोंदा पोलीस स्टेशन परिसरात पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी ढिकले म्हणाले, कोरोना काळात ऑक्सिजन कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्याच बरोबर कोरोनाने समाजाला ऑक्सिजनचे महत्वही समजले आहे.यावेळी वृक्षारोपण करताना महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे यांनी या उपक्रमाचे कार्य कौतुकास्पद असून यापुढेही, असे उपक्रम राबवावे असे ते म्हणाले.तसेच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरीक्षक ढिकले यांनी पोलीस कर्मचारी अधिकारी यांना शुभेच्छा देत अशाच नवीन नवीन उपक्रम मधून समाजसेवेचे काम घडावी असे मत यावेळी व्यक्त केले.यावेळी सपोनि.विठ्ठल पाटील, श्रीगोंदा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे,गोपनीयचे संतोष कोपनर, पत्रकार शकील शेख, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे