• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 21, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले ! एक सदस्यीय प्रभाग पद्धत , कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
25/08/2021
in ठळक बातम्या, राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड,दि.२५ : -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका सन 2022 मध्ये मुदत संपुष्टात येत असलेल्या महापालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने वॉर्ड रचनेचे काम हाती घेतले असून, राज्य शासनाच्या निर्णयानुसार एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना आदेश बजाविले आहेत.या आदेशानुसार सध्या तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी एक सदस्यीय वॉर्ड रचना सुरू करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी दि. 25 सन 2022 रोजी मुदत संपुष्टात येत असलेल्या राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महापालिकांची मुदत 2022 मध्ये संपुष्टात येत आहे. या 18 महापालिकांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने प्रारुप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 31 डिसेंबर 2019 रोजी राज्य शासनाने राज्यातील महापालिकांमधील बहुसदस्यीय पद्धत बंद करून एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती.
शासनाच्या या निर्णयानुसार महापालिकांच्या वॉर्ड रचनेचा प्रारुप आणि कच्चा आराखडा तयार करण्याबाबत सूचविण्यात आले आहे. सन 2011 ची जनगणना विचारात घेऊन मतदारसंख्या निश्‍चित केली जाणार असून, अद्ययावत मतदार याद्याही तयार करण्याबाबत सूचविले आहे. प्रभागाची प्रारुप रचनेचे काम 27 ऑगस्टपासून हाती घेण्यात यावे तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत.
अंतिम प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम यथावकाश निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाईल, असेही या आदेशात म्हटले आहे.
राज्य शासनाचा अंतिम निर्णय महत्त्वाचा
डिसेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग रचनेचे काम हाती घेतले असले तरी मुंबई वगळता इतर ठिकाणी द्विसदस्यीय प्रभाग रचना करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये खलबते सुरू आहेत. राज्य शासनाने नजीकच्या काळात निर्णय घेतल्यास तसेच त्याला विधीमंडळाची मान्यता मिळाल्यास सध्या बनविण्यात येणाऱ्या प्रारुप एकसदस्यीय प्रभाग रचनेला अंतिम रुप देताना दोन प्रभाग एकत्र करून द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनेही निवडणूका होण्याची शक्‍यता आहे. अंतिम निर्णय हा राज्य सरकारवरच अवलंबून राहणार आहे.

Previous Post

पुण्यातील २९ औषध दुकानांचे परवाने रद्द तर १४६ दुकानांचा परवाना निलंबनाची कारवाई

Next Post

पुण्यातील हॉटेलमध्ये पैसे मागणे पडले महागात , पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

Next Post

पुण्यातील हॉटेलमध्ये पैसे मागणे पडले महागात , पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist