पुणे : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई केली आहे. रविवार अखेर एकूण ५६ सुवर्ण, ४४ रौप्य आणि ५६ कांस्य पदकांची कमाई करीत महाराष्ट्राचा संघ १५६ पदकांसह आघाडीवर राहिला.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दिवसभरात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरण, जिम्नॅस्टिक, अॅथलेटिक्स, बॅडमिंटनमध्ये यश मिळवित विविध खेळांमध्ये पदके मिळविली आहे.

बॅडमिंटन मध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका
बॅडमिंटनमध्ये सतरा वर्षाखालील मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या आर्या देशपांडे व अनन्या फडके यांनी अजिंक्यपद मिळविताना राजस्थानच्या साक्षी असरानी व अनुष्का मेहता यांचा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. हा सामना त्यांनी २१-१६, २१-१३ असा जिंकला. तसेच मुलांच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राकडून खेळणाºया अमन फारुख संजय याने अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली.२१ वर्षाखालील मुलींच्या एकेरीत महाराष्ट्राच्या मालविका अडसूळ हिला आंतरराष्ट्रीय खेळाडू आकर्षि कश्यप हिच्यापुढे प्रभाव दाखविता आला नाही. कश्यप हिने हा सामना २१-११, २१-१६ असा जिंकून सुवर्णपदक जिंकले. तर, मालविका हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अमन याने उत्कंठापूर्ण लढतीत कर्नाटकच्या राहुल भारद्वाज याचे आव्हान २१-१७, २३-२१ असे परतविले. हा सामना विलक्षण रंगतदार झाला आहे.

जलतरण :-
जलतरणात युगा, केनिशा व वेदांत यांची सोनेरी कामगिरी, खेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; महाराष्ट्राच्या खेळाडूंचे वर्चस्व कायम
जलतरणात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व कायम राखले. युगा बिरनाळे, केनिशा गुप्ता व वेदांत बापना यांनी आपल्या नावावर पुन्हा सुवर्णपदकाची नोंद केली. केनिशा हिने १७ वषार्खालील मुलींच्या गटात २०० मीटर्स मिडले रिले शर्यत दोन मिनिटे २९.६८ सेकंदात जिंकली. तिच्या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने चार बाय १०० मीटर्स मिडले रिले शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. त्यांनी ही शर्यत ४ मिनिटे ४३.०६ सेकंदात पूर्ण केले आहे .व युगा बिरनाळे हिने आज रिले शर्यतीसह दोन शर्यतींमध्ये सुवर्णपदक तर एका शर्यतीत ब्राँझपदक जिंकले. तिने २०० मीटर्स मिडले शर्यत २ मिनिटे ३२.७५ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. तिने महाराष्ट्राला चार बाय १०० मीटर्स मिडले रिलेतही अजिंक्यपद मिळवून दिले. त्यांनी हे अंतर ४ मिनिटे ४१.१७ सेकंदात पूर्ण केले. त्याखेरीज तिने २०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत तिसरे स्थान घेतले. तिला हे अंतर पार करण्यास २ मिनिटे ३४.०९ सेकंद वेळ लागला.मुलांच्या १७ वषार्खालील गटात वेदांत बापना या महाराष्ट्राच्या खेळाडूने २०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यत २ मिनिटे १०.४६ सेकंदात जिंकली. महाराष्ट्राच्या सुश्रुत कापसे याला २१ वषार्खालील आठशे मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत रौप्यपदक मिळाले. त्याने ही शर्यत ८ मिनिटे ३६.८९ सेकंदात पूर्ण केली.

नेमबाजीत मेहुली घोष व अभिनव शॉ विजेते महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटील हिला कास्यं
पश्चिम बंगालच्या मेहुली घोष या आंतरराष्ट्रीय खेळाडूने दहा वर्षीय खेळाडू अभिनव शॉ याच्या साथीत दहा मीटर्स एअर रायफल मिश्रदुहेरी विभागात सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी ५०१.७ गुणांची नोंद केली. तसेच महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटील हिने २१ वर्षाखालील मुलींच्या गटात २५ मीटर पिस्तुल प्रकारात कास्यंपदक मिळविले. अभिज्ञाने २० गुण नोंदविले.
राजस्थानच्या दिव्यांश सिंग पन्वर व मानिनी कौशिक यांना रौप्यपदक मिळाले. त्यांनी ४९६.१ गुण मिळविले. मध्यप्रदेशच्या श्रेया अगरवाल व हर्षित बिंजवा यांनी ४३३.६ गुणांसह ब्राँझपदक पटकाविले. अभिज्ञाला कास्यंपदक मिळालेल्या गटात दिल्लीची देवांशी राणा (२४ गुण) व हरयाणाची अंजली चौधरी (२३ गुण) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळविले.
महाराष्ट्राच्या आशुतोष मुरकुटे व शरयू दळवी यांनी ट्रॅपच्या मिश्र दुहेरी गटात कास्यंपदक पटकाविले. त्यांना २७ गुण मिळाले

तसेच दिनेश सिंग याने २१ वषार्खालील गटाच्या दहा हजार मीटर्स धावण्याच्या शर्यत जिंकून नेत्रदीपक कामगिरी केली. अक्षय गोवर्धन याने मुलांच्या दोनशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत ब्राँझपदक जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली.
अवंतिका हिने दोनशे मीटर्सचे अंतर २४.४७ सेकंदात पार केले. १७ वषार्खालील गटात मुलांच्या दोनशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत अक्षय गोवर्धन याचे रौप्यपदक थोडक्यात हुकले. त्याने हे अंतर २२.१३ सेकंदात पार केले. मुलांच्या २१ वषार्खालील गटात दिनेश सिंग याने दहा हजार मीटर्सचे अंतर ३१ मिनिटे ५८.१६ सेकंदात पार करीत विजेतेपदावर नाव कोरले. त्याने सुरेख धाव घेत ही शर्यत जिंकली.
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी १७ वषार्खालील चार बाय ४०० मीटर्स रिले शर्यतीत ब्राँझपदक पटकाविले. त्यांनी हे अंतर चार मिनिटे ०.५६ सेकंदात पार केले. केरळ (३ मिनिटे ५४.६८ सेकंद) व तामिळनाडू (३ मिनिटे ५९.२८ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले. मुलांच्या विभागात महाराष्ट्राला रौप्यपदक मिळाले. त्यांनी ही चार बाय ४०० मीटर्स रिले शर्यत तीन मिनिटे २५.८९ सेकंदात पूर्ण केली.
केरळने ही शर्यत तीन मिनिटे २४.४५ सेकंदात जिंंकली. मुलींच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राने चार बाय चारशे मीटर्स रिले शर्यत तीन मिनिटे ४९.९५ सेकंदात जिंकली. या संघात निधीसिंग योगेंद्र, संगिता शिंदे, रोझलीन रुबेन व दुर्गा देवरे यांचा समावेश होता. मुलांमध्ये मात्र महाराष्ट्र संघास तांत्रिक कारणास्तव शर्यतीमधून बाद करण्यात आले.
मुलांच्या १७ वषार्खालील गटात महाराष्ट्राच्या इंद्र्रजित फरकाटे याने आठशे मीटर्स शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. त्याने ही शर्यत एक मिनिट ५५.३८ सेकंदात पार केली. महाराष्ट्राच्या शर्वरी परुळेकर हिने आपल्या संघास आणखी एक सोनेरी यश मिळवून दिले. तिने १७ वषार्खालील गटात तिहेरी उडीचे सुवर्णपदक जिंकले. तिने १२.२२ मीटर्स अंतरापर्यंत उडी मारली. महाराष्ट्राच्या पूर्वा सावंत हिला ब्राँझपदकाची कमाई झाली. तिने १२.०७ मीटर्सपर्यंत उडी मारली. याच वयोगटात आदिती बुगड हिने थाळीफेकमध्ये ब्राँझपदक पटकाविले. तिने ३९.०८ मीटर्सपर्यंत थाळी फेकली.
खो खो :-
खो खो मध्ये महाराष्ट्राची शानदार सलामी खेलो इंडिया युथ गेम्स पुणे
अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राने मुलांच्या १७ व २१ वषार्खालील गटात दणदणीत विजय मिळवित खो खो मध्ये झोकात सलामी केली. महाराष्ट्राने १७ वर्षाखालील मुलांच्या एकतर्फी लढतीत गुजरातला ११-९ असे दोन गुण व साडेसात मिनिटे राखून पराभव केला. मुलांच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राने छत्तीसगढ संघाचा २०-१२ असा एक डाव ८ गुणांनी धुव्वा उडविला. महाराष्ट्राकडून अवधूत पाटील (१ मि.१० सेकंद व १ मि.४० सेकंद, तसेच चार गडी), मिलिंद कुरपे (२ मिनिटे व चार गडी), अरुण गुणके (२ मि.२० सेकंद व तीन गडी) यांनी अष्टपैलू कामगिरी केली.
जिम्नॅस्टिक्स :-
महाराष्ट्राच्या खेळांडूंनी जिम्नॅस्टिक्समधील वर्चस्व कायम राखताना रविवारी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. आदिती दांडेकर हिने दोन प्रकारात तर रिचा चोरडिया व अरिक डे यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळवित महाराष्ट्राच्या यशात महत्त्वाचा वाटा उचलला. जिम्नॅस्टिक्सच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने चार रौप्य व एक ब्राँझपदकाची कमाई केली.
मुलींच्या २१ वषार्खालील क्लब्ज प्रकारात रिचा हिने ११.६५ गुण नोंदवित सुवर्णपदक जिंकले. तिची सहकारी आदिती दांडेकर हिने १०.७५ गुणांसह रौप्यपदक मिळविले तर दिल्लीच्या मेहकप्रीत कौर हिने १० गुणांसह ब्राँझपदकाची कमाई केली. आदिती हिने रिबन्स प्रकारात सोनेरी कामगिरी करताना १२.१५ गुणांची नोंद केली. आदिती हिने चेंडू प्रकारातही सुवर्णपदकांची नोंद केली तिने १२.६५ गुण नोंदविले. जी.मेघना रेड्डी (त्रिपुरा) व किमया कदम (महाराष्ट्र) यांनी अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळविले. आदिती हिला हूप प्रकारात रौप्यपदक मिळाले. तिने १०.४५ गुण मिळविले.
हॉरिझोन्टल बार या प्रकारात अरिक याने सुवर्णपदक जिंकताना १२.२५ गुण नोंदविले. त्याचा सहकारी ओंकार शिंदे याने रौप्यपदक मिळविताना ११.४० गुणांची कमाई केली.समांतर बार प्रकारात अरिक याला रौप्यपदक मिळाले. त्याने १२.३० गुण मिळविले.
वेटलिफ्टिंग :-
वेटलिफ्टिंगमधील महाराष्ट्राच्या मयुरी देवरे हिने २१ वर्षाखालील मुलींमध्ये ब्राँझपदक मिळविले. तिने ७६ किलो गटात स्नॅचमध्ये ७९ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ९७ किलो असे एकूण १७६ किलो वजन उचलले. महाराष्ट्राच्या श्रेया गुणमुखी हिने १७ वर्षाखालील ७६ किलो गटात रौप्यपदक पटकाविले. तिने स्नॅचमध्ये ६६ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ८१ किलो असे एकूण १४७ किलो वजन उचलले.
ज्युदो :-
ज्युदोमधील महाराष्ट्राच्या तन्वीन तांबोळी हिने २१ वषार्खालील गटामधील ७० किलो वजनी विभागात सुवर्णवेध घेतला. तिने अंतिम लढतीत राजस्थानच्या संजू चौधरी हिच्यावर शानदार विजय मिळविला. तन्वीत ही येथील क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण घेत आहे. ती मधु काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. महाराष्ट्राने रविवारी २१ वषार्खालील मुलांच्या विभागात आणखी तीन ब्राँझपदकांची कमाई केली. त्यांच्या अभिषेक काळवंदे (१०० किलोखाली), वैभव पवार (१०० किलोवर) व तुषार सातपुते (९० किलोखाली) यांचा समावेश होता.