पुणे : ट्रायच्या निर्णयानुसार येत्या १ फेब्रुवारी २०१९ पासून टीव्ही आणि मोबाईलवरील सर्वच चॅनल्सचे प्रसारण बंद पडणार आहे. उत्तम सेवा देण्याची अपेक्षा ग्राहक वर्गाने व्यक्त केली आहे.
मोबाईलवर दिसणारे टीव्ही चॅनल्सचे प्रसारणही १ फेब्रुवारी पासून बंद पडणार आहे. कारण प्रत्येक मोबाईलमध्ये आयपी पॅड असतो. हा आयपीटीव्ही अॅप बंद पडणार असल्याने प्रसारण मोबाईलवरून पाहता येणार नाही. मोबाईलवरील चार अॅप्स पे होणार आहेत. त्याचा भुर्दंडही मोबाईल ग्राहकांना बसणार आहे.
मात्र ग्राहकांना १३० रुपये भरून प्रसार भारतीच्या डिशवर एचडी चॅनल्स पाहता येणार आहेत,१ फेब्रुवारीपासून ट्रायचा नवा नियम लागू होत आहे. पॅकेजच्या निवडीसाठी केबल ग्राहकांना २६ जानेवारीपर्यंत संधी आहे. त्यानंतर १ फेबु्रवारीपासून पॅकेज न घेणाºया सर्वच ग्राहकांकडील प्रसारण सेवा आपोआपच ठप्प होणार आहे.