पुणे,दि.२३:- पुण्यातील FC रोडवर एका नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्ज घेत असल्याचे एक व्हिडीओ सोशल मीडियावर दिसून येत आहे शनिवारी पहाटे पर्यंत सुरु असणाऱ्या पार्टीत ड्रग्ज पुरवलं गेलं का?
कल्याणीनगर प्रकरणानंतर आणखी एक प्रकार पुण्यात समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात कल्याणीनगर येथील अपघाताचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यातील एका नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्ज घेतल्याचा प्रकार समोर येत आहे. पुण्याच्या शिवजीनगर भागातील एफसी सोडवर असणाऱ्या एका नामांकीत हॉटेलमध्ये काल मध्यरात्री मुलं सर्रासपणे ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारावर आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली. धंगेकर यांनी या मुद्द्यावरुन पोलीस, उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.
“या प्रकरणामध्ये पूर्णपणे पोलिसांची चूक आहे. अंमली पदार्थ सर्रासपणे मिळतोय. तसेच असे अंमली पदार्थ काही हॉटेलमध्ये मिळत आहेत. हुक्का पार्लरच्या नावाखाली पुणे शहरात असे प्रचंड प्रमाणात अंमली पदार्थ मिळतात. यामध्ये पोलिस.अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे दुर्लक्ष करतात. आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.
“आम्ही एवढं मोठं आंदोलन करुन सुद्धा संबंधित अधिकाऱ्याची बदली सुद्धा झाली नाही. याचा अर्थ असा आहे की, शंभूराज देसाई या अधिकाऱ्यांना पाठिशी घालतात. हे खोके सरकार पाठिशी घालतात. हा पैसा राजकारणात वापरण्यासाठी आमच्या तरुणाईला बरबाद करण्याचं काम हे लोकं करतात. त्यामुळे ही सर्व चूक पोलीस आणि त्या खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांची आहे”, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.
“ज्या हॉटेलमध्ये हे सर्व चालत असेल त्यांना कायम स्वरुपी सिल लावल पाहिजेत आणि बंद केली पाहिजेत. आता हॉटेल चालकांना भीती राहिीलेलील नाही. अजूनही पहाटे चार वाजेपर्यंत बार चालतात. अजूनही ही कीड संपलेली नाही. निव्वळ पैसे, हप्ता यांच्या नादात पुण्याचं नाव बरबाद करण्याचं काम ही मंडळी करत आहेत. आम्ही रस्त्यावर उतरुन या लोकांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या अधिवेशानत या विषयावर आम्ही बोलणार”, अशी भूमिका रवींद्र धंगेकर यांनी मांडली.