मुंबई,दि.२३ :-उद्याच्या पुकारण्यात आलेला ‘महाराष्ट्र बंद’ मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीकडून उद्या पुकारण्यात आलेला ‘महाराष्ट्र बंद’ बेकायदेशीर असल्याचे सांगत तसं केल्यास कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
बदलापूर येथील शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. याच्या विरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते व सुभाष झा यांनी याचिका दाखल केली होती.
मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठात याचिकेवर सुनावणी झाली.
खंडपीठने म्हटले की, महाराष्ट्र सरकार बंद रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलेल.
आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा कोणत्याही व्यक्तीला बंदचे आवाहन करण्यापासून मनाई करत आहोत.
कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही असे खंडपीठाने म्हटले आहे.
अशा प्रकारचा बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत बंद केला तर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.